पिंपरी-चिंचवड

हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

CD

पिंपरी, ता. २८ : लग्‍नात हुंडा न दिल्याने तसेच कामाला जात नाही म्हणून सासरच्या मंडळींनी केलेल्‍या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. पिंपळे सौदागर येथील झिंजुर्डे मळा येथे ही घटना घडली.
काजल रवींद्र वाघमारे (वय २२, रा. झिंजुर्डे मळा, पिंपळे सौदागर) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची आई जिजाबाई परमेश्‍वर कांबळे (वय ४३, रा. वैशालीनगर, बाभळगाव, ता. जि. लातूर) यांनी सांगवी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी रवींद्र गोपाळ वाघमारे, बेबन गोपाळ वाघमारे आणि गोपाळ वाघमारे (सर्व रा. माटेगडी, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्यावर गुन्‍हा दाखल केला आहे. फिर्यादी यांची मुलगी काजल परमेश्वर कांबळे (लग्‍नानंतरचे नाव काजल रवींद्र वाघमारे) यांना त्यांचा पती रवींद्र, सासू बेबन तसेच सासरा गोपाळ यांनी आपापसांत संगनमत करून घरगुती कारणावरून वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केली. मानसिक व शारीरिक त्रास देत त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT