पिंपरी-चिंचवड

चोरीच्या सोनेची विक्री प्रकरणी सासूसह सराईत चोरटा गजाआड

CD

पिंपरी, ता. २७ : पादचारी महिलांच्या गळ्यातील हिसकावलेले दागिने विकण्यासाठी सासूसोबत आलेल्या एका सराईत इराणी चोरट्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून नऊ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले.
सादिक शमल खान इराणी (वय ३४, रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) आणि नर्गीस जाफर इराणी (रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सोनसाखळी चोरी करणारा एक इराणी गुन्हेगार निगडी परिसरात संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने ट्रान्सपोर्टनगरमधून सादिक इराणी आणि त्याच्या सासूला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकी देखील चोरीची असल्याचे समोर आले. त्याच्यावर सोनसाखळी चोरी, फसवणूक आणि इतर असे एकूण तब्बल १९ गुन्हे दाखल आहेत. सादिक हा अहमदनगर येथे राहत असून चोरी करण्यासाठी तो पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात येत होता. एका मित्रासोबत तो चोऱ्या करत असे. चोरीचे दागिने विकण्यासाठी सादिक हा त्याच्या सासूला घेऊन निगडी परिसरात आला होता. तेथे फिरत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT