पिंपरी-चिंचवड

जादा परताव्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक

CD

पिंपरी : कन्स्ट्रक्शन कंपनीत गुंतवणूक करत २९ टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत व्यावसायिक महिलेची २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार हिंजवडी व रावेत येथे घडला. याप्रकरणी चिखलीतील नेवाळेवस्ती येथील ३८ वर्षीय महिलेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव सुनील देशपांडे (वय २८ रा. सुखवाणी कोलोरोनिक सोसायटी, रावेत) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांना आरोपीने नोबल कन्स्ट्रक्शन या कंपनीत पैसे गुंतवल्यास २९ टक्के परतावा मिळेल असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी सुरुवातीला एक लाख २५ हजार रुपये गुंतवले. त्याचे एक महिन्यात फिर्यादीला एक लाख ६१ हजार २५० रुपये दिले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन होताच फिर्यादीला आरोपीने वेगवेगळ्या बँक खात्यावर २५ लाख ८० हजार रुपये पाठवण्यास सांगितले. आरोपीने ते पैसे न गुंतवता त्याचा स्वतः वापर केला. फिर्यादी यांनी पैशांची मागणी करताच आरोपीने खोटे बँकेचे एनईएफटी व आरटीजीएस दाखवून फिर्यादीची २५ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली.

जखमी महिलेला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या टेंपोचालकाला मारहाण
भोसरी : टेम्पोची धडक बसल्याने दुचाकीस्वार महिला जखमी झाली. त्या जखमी महिलेला टेम्पोचालक उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना महिलेच्या ओळखीच्या तिघांनी टेम्पो चालकाला मारहाण करून टेम्पोची तोडफोड केली. ही घटना एमआयडीसी भोसरी येथे घडली. याप्रकरणी तानाजी कुशाभाऊ कडाळे (रा. भगतवस्ती, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवम रामसुमेर वर्मा (वय २०), कृष्णा अजय आल्हाट (वय २०), धनंजय अरुण काळे (वय २१, तिघेही रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे त्यांचा टेम्पो घेऊन एमआयडीसी भोसरी येथून जात होते. दरम्यान डाव्या बाजूने अचानक दुचाकीस्वार महिला टेम्पोसमोर आल्याने टेम्पोची दुचाकीला धडक बसली. त्यात महिला जखमी झाली. फिर्यादी हे जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात होते. त्यावेळी जखमी महिलेच्या ओळखीच्या व्यक्तींनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या टेम्पोची काच फोडून आरोपी पसार झाले.

कुदळवाडीत १४ किलो गांजा जप्त
चिखली : गांजा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कुदळवाडी येथे अटक केली. त्यांच्याकडून १४ किलो ७६ ग्रॅम गांजा जप्त केला. अजरुद्दीन मुनीर शहा (वय ४०, रा. चिखली), हमीदउल्ला नसीमउल्ला खान (वय २४, रा. जाधववाडी, चिखली) यांना अटक केली असून, रोहित शर्मा (रा. चिखली) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कुदळवाडी येथे दोघेजण गांजा घेऊन आले असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अजरुद्दीन व हमीदउल्ला यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गांजासह दुचाकी, तीन मोबाईल फोन असा एकूण आठ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हा गांजा आरोपी रोहित शर्मा याच्याकडून आणल्याचे आरोपींनी सांगितल्याने शर्मा याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जॉबच्या बहाण्याने महिलेची फसवणूक
रावेत : पार्ट टाइम जॉबच्या बहाण्याने एका महिलेची ११ लाख १३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना शिंदेवस्ती, रावेत येथे घडली. याप्रकरणी रावेतमधील शिंदे वस्ती येथील ३३ वर्षीय महिलेने रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी महिलेने फिर्यादी महिलेशी संपर्क साधून ती ‘डीडीबी वर्ल्ड वाईल्ड मीडिया’ कंपनीची एचआर असल्याचे सांगितले. फिर्यादीस गुगल मॅपवर रिव्ह्यू देऊन पार्ट टाइम पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांना वेगवेगळे टास्क दिले. फिर्यादीस वेगवेगळ्या लिंक पाठवून त्यांना टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले. फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगून फिर्यादीची एकूण ११ लाख १३ हजार रुपयांची फसवणूक केली. रावेत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: नवल पगार गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT