पिंपरी-चिंचवड

पिंपरी बाप्पाच्या निरोपासाठी सज्ज

CD

गणरायाच्या निरोपासाठी कडेकोट व्यवस्था

महापालिकेकडून सोईसुविधा; पोलिसांकडून बंदोबस्ताची जय्यत तयारी

पिंपरी, ता. १५ ः गणेशोत्सवाचा समारोप मंगळवारी (ता. १७) होणार आहे. त्यानिमित्त निघणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांचे स्वागत पिंपरीतील संत तुकाराम महाराज चौकात (कराची चौक) आणि चिंचवड येथील चापेकर चौकात महापालिकेतर्फे केले जाते. समारोपाच्या पूर्वसंध्येला भोसरी परिसरासह अन्य भागातील छोटी मंडळे व घरगुती गणरायाचे विसर्जन केले जाते. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने गणेश भक्तांसाठी सोई-सुविधांची तर, पोलिस प्रशासनाने बंदोबस्ताची जय्यत तयारी केली आहे.
एकाच दिवशी शहरातील सर्व गणेश मंडळांऐवजी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या गावांतील गणरायांना निरोप देण्याची परंपरा पिंपरी-चिंचवडमधील गावांमध्ये अर्थात उपनगरांमध्ये आजही पाळली जात आहे. त्यानुसार सांगवी परिसरातील गणेश मंडळांनी महोत्सवाच्या सातव्या दिवशी अर्थात शुक्रवारी (ता. १३) लाडक्या गणरायाला निरोप दिला. अनंत चुतुर्दशीच्या पूर्वसंध्येला भोसरी परिसरातील मंडळे गणरायाला निरोप देतात. त्यानुसार भोसरीतील मंडळे सोमवारी (ता. १६) बाप्पाला निरोप देणार आहेत. पिंपरी, चिंचवड आणि निगडी-आकुर्डी प्राधिकरणातील मंडळे मंगळवारी (ता. १७) अनंत चतुर्थीच्या दिवशी गणरायाला निरोप देणार आहेत. त्यानुसार महापालिकेसह पोलिसांनीही नियोजन केले आहे.

आज, उद्या पिंपरी कॅम्प बंद
पिंपरी कॅम्प शहरातील सर्वात मोठी बाजापपेठ आहे. येथील साईचौक-राधिका चौक- शगून चौक- डीलक्स चौक या दिशांनी येणारी मंडळे संत तुकाराम महाराज चौकात एकत्र येतात. तिथून पुढे रिव्हर रोडने सुभाषनगर घाटावर मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे मोठी गर्दी या भागात असते. शिवाय, वाहतूक कोंडीही होऊ शकते. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त सोमवार (ता. १६) आणि मंगळवारी (ता. १७) संध्याकाळी सहानंतर पिंपरी कॅम्प परिसरातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पिंपरी मर्चंट फेडरेशनने घेतला आहे.

घाटांवर चोख व्यवस्था
- शहरातील मुळा, पवना, इंद्रायणी नदी घाटांवर गणेश मूर्तींचे विसर्जनाची व्यवस्था
- नदी प्रदूषण रोखण्यासाठी थेट नदीतील पाण्यात मूर्ती विसर्जन करण्यास मनाई
- भाविकांच्या सोईसाठी नदी घाटांसह शहरातील अंतर्गत भागात कृत्रिम हौदांची निर्मिती
- परिसरांत चोख बंदोबस्त असून सुरक्षिततेसाठी महापालिकेसह पोलिस यंत्रणा सज्ज
- लाइफ जॅकेट, लाइफ रिंग, गळ, बोट, मेगा फोन, दोरी अशा रेस्क्यू साहित्यासह अग्निशमन पथक आणि सर्पमित्र, जीवरक्षक, सुरक्षारक्षकही तैनात

वाहतुकीत बदल
गणेशोत्सवात देखावे व मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते. ती सुरळीत राहावी, यासाठी शहरातील वाहतूक मार्गांत पोलिसांनी बदल केले आहेत. फुगेवाडी-दापोडी, भोसरी, हिंजवडी, वाकड, पिंपरी, चिंचवड, निगडी भागातील वाहतुकीत बदल आहेत.

महापालिकेतर्फे गणेशमूर्तींचे संकलन केले जात आहे. घाटांवर कृत्रिम हौद उभारले आहेत. अग्निशमन विभागाने २७ घाटांवर लाइफ जॅकेट, लाइफ रिंग, गळ, बोट, मेगा फोन, दोरी अशा रेस्क्यू साहित्यासह जवान तैनात आहेत. पवना, मुळा, इंद्रायणी नदी घाटांसह क्षेत्रीय कार्यालय स्तरावर विविध ८५ ठिकाणी मूर्तीदान व संकलन केंद्रांची व्यवस्था केली आहे.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal : अंगावर धावणे महागात पडले, ICCची यशस्वी जैस्वालवर कारवाई! ५ सामन्यांची बंदी की आणखी काही? नेमका काय निर्णय घेतला...

ती गोष्ट घडली आणि लता मंगेशकर यांनी रागात थेट CID च्या निर्मात्यांनाच केलेला फोन केला, इन्स्पेक्टर दयाने सांगितला किस्सा

Nigdi Chakan Metro : भोसरीतील उड्डाणपूल पाडण्यावरून राजकीय मौन; निगडी-चाकण मेट्रो ‘डीपीआर’ला मंजुरीची प्रतीक्षा

Marathi News Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT