पिंपरी-चिंचवड

दीपावली पाडव्यानिमित्त ‘स्वर सावनी’

CD

पिंपरी, ता. १० ः तुम्हाला मराठी गीतं आवडतात का? त्यातही जुन्या काळातील भावगीतं, चित्रपट गीतं, लोकसंगीत, भक्तिसंगीत आहे का? किंवा अशा गाण्यांमध्ये तुम्हाला रुची आहे का? जुन्या गाण्यांसोबतच नवीन गाणीही ऐकायची आहेत? तर मग तुमच्यासाठी दिवाळी पाडव्यानिमित्त २२ ऑक्टोबर रोजी ‘सकाळ’ घेऊन येत आहे ‘स्वर सावनी’ हा दीपावली पाडवा संगीतमय मैफलीचा सुरेल कार्यक्रम.
‘स्वर सावनी’ कार्यक्रम म्हणजे सुरांच्या माध्यमातून साकारलेला एक भावना प्रवास आहे. तोही मराठी संगीताच्या सुवर्णयुगापासून आजच्या आधुनिक युगापर्यंतचा. या संगीतमय कार्यक्रमात सावनी रवींद्र आपल्या खास आवाजातून मराठी चित्रपट, मालिकांतील तसेच स्वतःच्या लोकप्रिय गीतांचा सुरेल मेळ घालणार आहेत. त्यांच्या गाण्यांसह विविध प्रसिद्ध गायक-गायिकांची अजरामर गाणीही सादर केली जाणार आहेत. यात लता मंगेशकर, आशा भोसले यांसह दिग्गज संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, सुधीर फडके यांच्यापासून अजय-अतुलपर्यंतच्या गीतांचा समावेश आहे. उत्तम दर्जाचे वाद्यवृंद, कोरस गायकांचा सुरेल साथसंगत आणि सहगायकांचा समन्वय यामुळे प्रत्येक गाणे अधिक रंगतदार आणि समृद्ध होते, हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पारंपरिकतेचा गंध, आधुनिकतेची झळाळी आणि मराठी संगीताचा समृद्ध वारसा एकाच वेळी अनुभवायला मिळणार आहे. तेही विनाशुल्क.

दीपावली पाडव्यानिमित्त...
काय? ः जुन्या-नव्या मराठी गीतांचा सुरेल कार्यक्रम ‘स्वर सावनी’
कुठे? ः प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
कधी? ः बुधवार, २२ ऑक्टोबर २०२५
केव्हा? ः दीपावली पाडवा पहाटे ५.३० वाजता
प्रवेश ः विनामूल्य, मात्र प्रवेशिका आवश्यक
अधिक माहितीसाठी संपर्क ः रत्नदीप ः ८६६८३९८०३१
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारुकांडातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत, महापालिकेत नोकरीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

Rajat Patidar: Dhoni रोहितची बरोबरी? फायनलपूर्वी RCB कर्णधार रजत पाटीदारने मनातील गोष्ट सांगितली म्हणाला मी कधी विचार..

Gemini Omni ने बदलली व्हिडिओ एडिटिंगची दुनिया; AI वापरुन मिनिटात बनवा हवा तसा व्हिडिओ, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

US-Iran Deal : अमेरिका-इराण अंतिम करार पुन्हा खोळंबला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' २ नव्या मागण्यांनी वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT