पिंपरी-चिंचवड

व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीला विजेतेपद

CD

पिंपरी, ता. ४ ः पीसीएमसीज् व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीतर्फे आयोजित ११ वर्षांखालील गटातील ‘व्हेरॉक करंडक’ क्रिकेट स्पर्धेत यजमान व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीच्या संघाने क्रिक फायटर्सवर ४८ धावांनी मात करत विजेतेपद पटकाविले. गोलंदाज सुधाकर राठोड सामन्याचा मानकरी ठरला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण कर सल्लागार राजेंद्र दुर्वे, महापालिकेचे सहशहर अभियंता मनोज सेठिया, कार्यकारी अभियंता विजय जाधव यांच्या हस्ते तसेच भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्यासह अकादमीचे प्रशिक्षक राहुल वेंगसरकर, चिंतामणी वैद्य, चंदन गंगावणे, प्रमोद लिमण यावेळी उपस्थित होते.
वेंगसरकर म्हणाले, ‘‘खेळापेक्षा कुणीही मोठा नाही. खेळाडू शिस्तप्रिय असायलाच हवा. मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला कमी न लेखता एकमेकांचा आदर करायला हवा. पंचांनी दिलेला निर्णय मान्य करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.’’
डॉ. विजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून यशवर्धन आजबे (क्रिक फायटर्स) याला तर स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्तम खेळाडू म्हणून सुधाकर राठोड (व्हेरॉक- वेंगसरकर) याला यावेळी गौरविण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाने अंतिम सामन्यात २१६ धावांचे लक्ष्य प्रतिस्पर्धी संघ क्रिक फायटर्ससमोर ठेवले. त्यामध्ये शौर्य कांबळे आणि युनूस खान यांच्या अर्धशतकी खेळींचे महत्वाचे योगदान राहिले. आव्हानाचा पाठलाग करताना यशवर्धन आजबे व्यतिरिक्त अन्य फलंदाज यजमान संघाच्या गोलंदाजीसमोर टिकाव धरू शकले नाहीत. यशवर्धनचे अर्धशतक केवळ एका धावेने हुकले. संघाचा डाव १६९ वर आटोपला.

संक्षिप्त धावफलक
व्हेरॉक-वेंगसरकर ः ३५ षटकांत ४ बाद २१६ - शौर्य कांबळे ६६, युनूस खान नाबाद ५३, अर्जुन शेटे नाबाद ३७ (प्रचिती पाटील १-३२, श्लोक येरुनकर १-३०, रुद्र चौगुले १-३६, स्वरित पाटील १-२७) वि.वि. क्रिक फायटर्स ः
३३.५ षटकांत सर्वबाद १६९ - यशवर्धन आजबे ४९, रुद्र चौगुले २८, शहावेज पठाण २५ (सुधाकर राठोड ४-२८, सात्विक बोंबले ३-२५, शौर्य कांबळे २-२६)


PNE25U95072

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heatwave: पुणे परिसरात उष्णतेचा तडाखा; लोहगावचा पारा ४२ अंशांवर, तापमान आणखी वाढणार, अंगाची लाहीलाही..

मृण्मयी देशपांडेचं चालतं फिरतं घर पाहिलत का? आता महिनाभर तिथेच राहणार, Viral Video

Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

Latest Marathi News Live Update: राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI

SCROLL FOR NEXT