पिंपरी, ता. २७ : हिंजवडीतील जळीत बस हत्याकांडात जखमी झालेल्या आरोपी बसचालकाला गुरुवारी (ता.२७) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
जनार्दन निळकंठ हंबर्डीकर (वय ५४, रा. वारजे) असे अटक केलेल्या आरोपी बस चालकाचे नाव आहे. हिंजवडीतील विप्रो सर्कल फेज एक येथे बुधवारी (ता.१९) व्योमा कंपनीतील टेम्पो ट्रॅव्हल बसला आग लागून चार जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला; तर सहा जण गंभीर जखमी झाले. बसमधील शॉर्टसर्किटमुळे हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात कंपनीतील कामगारांसोबतचा वाद आणि चालक कामाच्या व्यतिरिक्त इतर कामे सांगत असल्याचा राग मनात धरून बस चालक हंबर्डीकर यानेच कंपनीतील बेन्झीन केमिकलच्या साहाय्याने बसमध्ये आग लावून कामगारांना जीवे मारण्याचा कट रचल्याचे समोर आले. या दुर्घटनेत चालक जनार्दन हा देखील जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.