पिंपरी-चिंचवड

तक्रारींचा ‘पाऊस’, पीडित ‘कोरडेच’ सायबर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प, हजारो तक्रारदार न्यायाच्या प्रतिक्षेत

CD

मंगेश पांडे ः सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता. ९ : ऑनलाइन आर्थिक फसवणूक यासह विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यासंदर्भातील तक्रारी प्राप्त होत असतात. मात्र, यामध्ये गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येते. मागील वर्षभरात राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सायबर गुन्ह्यासंदर्भातील तब्बल २२ हजार ९७३ तक्रारी प्राप्त झाल्या. तर विविध पोलिस ठाण्यात केवळ २८८ गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे सायबर फसवणुकीतील पीडित व्यक्ती न्यायाच्या प्रतीक्षेतच राहत असल्याचे दिसून येते.
सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने सामान्य नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. यामध्ये अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तर काही जणांना बदनामीला सामोरे जावे लागले आहे. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण सध्या वाढत आहे. दरम्यान, याबाबत गुन्हा दाखल होऊन वेळीच सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे आवश्यक आहे. दरम्यान, सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात यापूर्वी केवळ एक विभाग होता. आता स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्यात आले आहे. या ठाण्यात तज्ज्ञ अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता तरी सायबर गुन्ह्यातील पीडित व्यक्तीला तत्काळ न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘‘माझी ऑनलाइनद्वारे ४३ हजार रुपयांची फसवणूक झाली. याबाबत तक्रार देण्यासाठी मी पोलिस ठाण्यात गेलो असता, माझ्या तक्रारीची दाखल घेण्यात आली नाही. कशाला तक्रार देता, पैसे मिळून जातील, असे सांगण्यात आले.
- एक तक्रारदार.
-------------------------
मागील वर्षी आयटी ॲक्ट अंतर्गत पोलिस ठाणेनिहाय दाखल झालेले गुन्हे

पोलिस ठाणे दाखल गुन्हे उघड गुन्हे
पिंपरी ९ ३
संत तुकारामनगर ४ ००
भोसरी ८ १
दापोडी २ ०
सांगवी ३४ ४
चिंचवड २४ ३
निगडी १३ २
रावेत २१ १३
देहूरोड ३ ३
तळेगाव दाभाडे ८ १
शिरगाव ३ ०
वाकड ५७ ९
काळेवाडी १ ०
हिंजवडी ४१ ९
बावधन २ ०
चाकण ४ ०
महाळुंगे ९ २
आळंदी ३ २
दिघी ११ ६
चिखली ०८ १
भोसरी एमआयडीसी १२ ६
सायबर ११ ८
--------------------------------------------------------------------------
एकूण २८८ ७३
-----------------------------

मागील वर्षात पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारी

*ऑनलाइन आणि सोशल मिडियासंदर्भात - १ हजार ९७३
*ऑनलाइन फसवणूक - १९ हजार ३६

*हॅकिंग आणि संगणक प्रणाली - २८८
*ऑनलाइन सायबर ट्रॅफिकिंग - २७
*ऑनलाइन गॅम्बलिंग / बेटिंग - ३२
*क्रिप्टोकरन्सी गुन्हे - १८
*सायबर टेररिझम - ४५
*इतर सायबर गुन्हे - १ हजार ५५४
----------------------------------------------
एकूण २२ हजार ९७३
-----------------------------------------------

असे दाखल होतात गुन्हे

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्याची निर्मिती झाली. सध्या पन्नास लाखांपेक्षा जास्त रकमेच्या फसवणुकीचे गुन्हे या सायबर पोलिस ठाण्यात दाखल होत आहेत तर पन्नास लाखांपेक्षा कमी रकमेच्या फसवणुकीचे गुन्हे संबंधित पोलिस ठाण्यात दाखल होत आहेत. मात्र, ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठीही सायबर पोलिस ठाण्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे.
------------------------

‘‘प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दाखल घेतली जात आहे. तक्रारीची सर्व चाचपणी करून गुन्हा दाखल केला जातो. तसेच पुढील तपास करून आरोपींना अटक केली जाते.
- संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड.
-----------------------------

सायबर पोलिसांची कामगिरी

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मागील वर्षात सायबर चोरट्यांकडून तब्बल ३ कोटी ६७ लाखापेक्षा अधिक रक्कम परत मिळवली आहे. तसेच महाराष्ट्रासह, ओरिसा, झारखंड, गुजरात, राजस्थान, रशिया येथील शंभरपेक्षा अधिक आरोपींना अटक केली आहे.
------------------------------
साधनांची गरज
सायबर गुन्ह्यांचा व्याप मोठा आहे. या गुन्ह्यांच्या तपासासाठी आणखी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सायबर लॅब तसेच इतर साधनांची गरज असल्याचे अधिकारी सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT