पिंपरी-चिंचवड

‘प्राण्यांशी दयाळूपणे वागा’

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ९ : प्राण्यांच्या सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत सार्वजनिक वाहनांवर एक एप्रिलपासून ‘Be kind to Animals’ किंवा राज्यांच्या प्रादेशिक भाषेत ‘प्राण्यांशी दयाळूपणे वागा’ हे घोषवाक्य प्रदर्शित केले जाणार आहे.
या बाबतच्या सूचना परिवहन विभागाला देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहनांवर आतापर्यंत कुटुंब कल्याण, आरोग्य, प्रदूषण, रस्ता सुरक्षा, महिला सक्षमीकरण आणि साक्षरता याबाबत जनजागृती करणारे ‘नो हॉर्न ओके प्लीज, गो स्लो, मुलगी शिकली प्रगती झाली अशी विविध घोषवाक्ये प्रदर्शित करण्यात येत आहेत. आता यामध्ये आणखी एका घोषवाक्याची भर पडली आहे. भारतीय संविधानाच्या कलम ५१ अ (ग) मध्ये नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून सुधारणा करणे, आणि प्राणिमात्रांबद्दल दया-बुद्धी बाळगणे हे मूलभूत कर्तव्य नमूद केले आहे. तसेच केंद्र शासनाने प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्यासाठी प्राणी क्लेश प्रतिबंधक अधिनियम १९६० आणि वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ लागू केला आहे. पण, तरीही प्राण्यांना क्रुरतेने वागविण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्यावरही प्राण्यांचे अपघात होत असून त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्राण्यांवर दया करणे, त्यांचा छळ केला जाऊ नये, याकरिता नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक वाहनांच्या बाहेरील बाजूस ‘प्राण्यांशी दयाळूपणे वागा’ असा संदेश प्रकाशित केला जाणार आहे. हे घोषवाक्य रंगाने किंवा रेडिअमने प्रदर्शित करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

होर्मुझनंतर मलक्का सामुद्रधुनीकडे वळले ट्रम्प, भारतापासून १५० किमी अंतरावर; अमेरिकेनं केला मोठा करार, चीनची कोंडी

Investment: SIP की PPF? 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीत 15 वर्षांत कुठे मिळणार जास्त पैसा; जाणून घ्या सोप्या शब्दांत

'मला डिव्होर्सी मुलगाच हवा होता' लग्नासाठी अपूर्वा नेमळेकरचं होतं स्पष्ट मत, म्हणाली...'ज्याला त्या दुखाची जाणीवच...'

काय? आपल्या मुंबईत 'झोंबी' आलाय? रस्त्यावर तासनतास पुतळ्यासारखा वाकून उभा राहिला तरुण; लोक सुद्धा घाबरले! Viral Video

Latest Marathi News Live Update: पुण्यात पीएमपी बस ब्रेकडाउन वाढले; मार्चमध्ये १८००हून अधिक बस बंद, प्रवासी त्रस्त

SCROLL FOR NEXT