पिंपरी-चिंचवड

वैद्यकीय सुविधेत उद्योगनगरी ‘स्ट्रॉंग’ ‘कोरोना’तून धडा; चार वर्षात मल्टिस्पेशालिटी सेवा सक्षम

CD

पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १० ः कोरोना संसर्गातून धडा घेत महापालिकेने आरोग्य व वैद्यकीय सेवासुविधा सक्षम करण्यावर भर दिला आहे. दवाखान्यांची संख्या वाढवून रुग्णालयांतील खाटांची संख्या वाढवली आहे. यामध्ये अतिदक्षता विभागासह (आयसीयू, एनआयसीयू) वैद्यकीय, शस्रक्रिया, बालरोग, अस्थी, नाक-कान-घसा, दंतचिकित्सा, डायलिसिस, एक्स रे आदी सुविधांचा समावेश आहे. खाटांची संख्या ९५५ वरून एक हजार ५२१ वर गेली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात १० मार्च २०२० रोजी कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला आणि महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सजग झाली. या घटनेला सोमवारी (ता. १०) पाच वर्ष पूर्ण झाली. पण, त्यावेळची महापालिकेची वैद्यकीय व आरोग्य सुविधा आणि आताची स्थिती यामध्ये खूप मोठा फरक झालेला असतो. ‘कोरोना’तून धडा घेत महापालिकेने स्वतःच्या वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर भर दिला आणि त्यातून पाच नवीन रुग्णालयांची निर्मिती, स्वतंत्र नेत्र रुग्णालयाची निर्मिती, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) सुविधा व मनुष्यबळात वाढ केली. कारण, त्यावेळी केवळ वायसीएम हेच मल्टिस्पेशालिटी रुग्णालय होते. आता पाच रुग्णालयांची भर पडली आहे. आणखी तीन रुग्णालये दृष्टिक्षेपात आहेत. त्यामुळे रुग्णांना शहरात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळू लागल्या आहेत. शिवाय, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांपासून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांपर्यंत महापालिका दंडात्मक कारवाई करत आहे. रस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृह व सार्वजनिक ठिकाणांची काळजीपूर्वक नियमित साफसफाई केली जात आहे. त्यामुळे वैद्यकीय बरोबरच आरोग्य सुविधा सक्षम केल्या आहेत.

रुग्णालयनिहाय वैद्यकीय सुविधा
- वायसीएम व नवीन थेरगाव रुग्णालय ः आयसीयू, एनआयसीयू, वैद्यकीय, शस्रक्रिया, स्रीरोग व प्रसूती, बालरोग, अस्थिरोग निदान, नाक-कान-घसा, दंतचिकित्सा, डायलिसिस, एक्स रे, सीटी स्कॅम, एमआयआर, स्कीन
- नवीन भोसरी व नवीन आकुर्डी रुग्णालय ः आयसीयू, एनआयसीयू, वैद्यकीय, शस्रक्रिया, स्रीरोग व प्रसूती, बालरोग, नाक-कान-घसा, दंतचिकित्सा, एक्स रे
- नवीन जिजामाता रुग्णालय ः आयसीयू, एनआयसीयू, वैद्यकीय, शस्रक्रिया, स्रीरोग व प्रसूती, बालरोग, अस्थिरोग निदान, नाक-कान-घसा, दंतचिकित्सा, एक्स रे
- तालेरा रुग्णालय चिंचवड ः वैद्यकीय, स्रीरोग व प्रसूती, बालरोग, दंतचिकित्सा, एक्स रे
- यमुनानगर रुग्णालय ः वैद्यकीय, स्रीरोग व प्रसूती आणि बालरोग
- सांगवी रुग्णालय ः स्रीरोग व प्रसूती आणि बालरोग
- नेत्र रुग्णालय नेहरूनगर ः नेत्ररोग निदान, चिकित्सा व शस्रक्रिया

भविष्यातील नियोजन
- मोशी येथील ७५० खाटांच्या क्षमतेचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय प्रस्तावित
- चिंचवड येथील २०० खाटांच्या क्षमतेचे नवीन तालेरा रुग्णालय सुरू होणार
- चिंचवड येथील जुन्या तालेरा रुग्णालयात बर्नवॉर्ड करण्याचे नियोजन
- थेरगाव येथील नवीन थेरगाव रुग्णालयाशेजारी कर्करोग निदान रुग्णालय अंतिम टप्प्यात
- महापालिकेचे ३० दवाखाने असून, शंभर जिजाऊ क्लिनिक आणि प्रत्येक प्रभागात आपला दवाखाना उपक्रम राबविण्याचे नियोजन

महापालिका रुग्णालयांतील खाटा
रुग्णालय / डिसेंबर २०२० पर्यंत / जानेवारी २०२१ नंतर
नवीन थेरगाव / १६ / ३४०
नवीन भोसरी / ७० / १००
नवीन जिजामाता पिंपरी / १२ / १३०
नवीन आकुर्डी / २६ / १२०
तालेरा चिंचवड / ४५ / ४५
सांगवी रुग्णालय / २० / २०
यमुनानगर रुग्णालय / २० / २०
वायसीएम पिंपरी / ७५० / ७५०
एकूण / ९५५ / १५२१

सुविधांनिहाय खाटांची संख्या
रुग्णालय / आयसीयू / एनआयसीयू/ डायलिसिस
नवीन थेरगाव / २६ / १४ / १०
नवीन भोसरी / १० / ६ / ५
नवीन जिजामाता / १४ / १० / ५
नवीन आकुर्डी / १२ / १२ / ५
तालेरा चिंचवड / ४५ / ४५ / ५
वायसीएम पिंपरी / ४८ / १८ / १०
एकूण / ११० / ६० / ४०

‘‘कोरोनानंतर नवीन पाच रुग्णालये सुरू केली आहेत. वायसीएमबरोबरच तेही मल्टिस्पेशलिटी सुविधांची आहेत. नवीन तालेरा रुग्णालय मिळून १७२१ बेडची सुविधा आहे. त्यात आयसीयू, एनआयसीयू, डायलिसिस अशा पायाभूत वैद्यकीय सुविधा वाढल्या आहेत. नेत्र रुग्णालय स्वतंत्र आहे. बर्न व कॅन्सर हॉस्पिटल अंतिम टप्प्यात आहेत. मोशीत मल्टिस्पेशालिटी रुग्णालय प्रस्तावित आहे.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, महापालिका
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT