पिंपरी-चिंचवड

आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित होणार सोपे निगडीतील गदिमा सभागृहात ‘सकाळ विद्या’चे उद्या चर्चासत्र

CD

पिंपरी, ता. १२ ः आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने गणित शिकविण्याची पद्धत अभिजित भांडारकर यांनी आत्मसात केली आहे. त्यामुळे आता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना किचकट असणारा गणिताचा विषय सोपा झाला आहे. माध्यमिक शिक्षणात गणित विषय कसा आनंददायी होईल, यादृष्टीने ‘सकाळ विद्या’ आणि भांडारकर ॲकॅडमी यांच्यावतीने उद्या विनामूल्य चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगुळकर सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणार आहे. सर्वासाठी विनामूल्य असणाऱ्या या चर्चासत्रामध्ये भांडारकर ॲकॅडमीचे संस्थापक संचालक अभिजित भांडारकर मार्गदर्शन करणार आहेत. उच्च शिक्षणातील उत्तुंग भरारीची बीजे ही मुलांच्या माध्यमिक शिक्षणात म्हणजेच सातवी ते दहावीच्या अभ्यासात रुजलेली असतात. बऱ्याचदा गुणवत्ता असूनही केवळ योग्य मार्गदर्शनाचा अभाव, चुकीचे अभ्यासतंत्र यामुळे वर्षभर अभ्यास करूनही विद्यार्थी मागे पडतात. त्यामुळे अभ्यासाचे तंत्र व योग्य गुरूचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. प्रत्येक गोष्टीला सरावाची गरज असते. कोणत्याही खेळात तरबेज होण्यात सरावाची गरज असते. गणितही त्याला अपवाद नाही. एकदा का सूत्रे पाठ झाली, गणित सोडवायची पद्धत कळाली की गणित सोपे जाते. गणितातील क्लिष्ट असे हजारापेक्षा जास्त सूत्रे भांडारकर सांगणार आहे. गणित अवघड वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे चर्चासत्र उपयुक्त ठरणार आहे. तसेच यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासही मदत होणार आहे.

चर्चासत्राविषयी...
कधी : रविवारी, १६ मार्च २०२५
केव्हा : सायंकाळी ५ ते ८ वाजता
कुठे : ग. दि. माडगूळकर सभागृह, निगडी प्राधिकरण
वक्ते ः अभिजित भांडारकर
विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य
संपर्क : ९३०७७१५९०३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

SCROLL FOR NEXT