पिंपरी, ता. १८ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सेक्टर १२ येथे गृहप्रकल्प उभारला आहे. त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या दूर करण्याचे आदेश ‘पीएमआरडीए’ने बांधकाम कंत्राटदारांना दिले आहेत. काम पूर्ण होईपर्यंत देय रक्कमही प्रशासनाने थांबवली आहे.
‘पीएमआरडीए’ने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येथे ४ हजार ८८३ सदनिका उभारल्या आहेत. तेथे जवळपास ७० टक्के लाभार्थी वास्तव्यास आहे. या घरांमध्ये असलेल्या गळती, निकृष्ट बांधकाम आणि मलनि:स्सारण वाहिनीमधून येणारी दुर्गंधी याचबरोबर सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत तक्रारी रहिवाशांनी केल्या. या नागरिकांनी थेट आयुक्तांकडे पत्र व्यवहार केला. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेत संबंधित कंत्राटदाराने सदनिकाधारकांच्या अडचणी सोडवत त्यांना अटी शर्तीनुसार कामे करण्याचे निर्देश वेळोवेळी दिले. पण, कंत्राटदाराच्या कामाची गती अपेक्षित नसल्यामुळे कंत्राटदारास नोटीस बजावली होती. त्रुटी कोणत्या आहेत, या बाबत तपासणी करण्यासाठी ‘सीओईपी’ महाविद्यालयाला सांगण्यात आले होते. त्यांचा अहवाल येईपर्यंत संबंधित बांधकाम कंत्राटदारांना देय असलेली सुमारे १६ कोटी रुपयांची रक्कम थांबविण्यात आली होती. आता संबंधित अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. त्यातून प्रकल्पातील काही त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे. त्या दूर करण्याच्या सूचना ‘पीएमआरडीए’ने कंत्राटदारांना दिल्या आहेत. यापुढे एकही तक्रार राहणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट :
गृहप्रकल्पातील तक्रारींच्या अनुषंगाने तपासणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यावरून ‘सीईओपी’कडून अहवाल प्राप्त झाला आहे. तो पर्यंत संबंधित कंत्राटदारांची रक्कम थांबवून ठेवली होती. सध्या गृहप्रकल्पातील सर्व कामे व्यवस्थित करण्यात आली आहेत.
- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.