पिंपरी-चिंचवड

महापालिका ‘वृक्षसंवर्धन’चा ६२ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

CD

पिंपरी, ता. १८ ः महापालिका वृक्षसंवर्धन विभागाचे २०२४-२५ च्या अर्थसंकल्पातील पाच कोटी नऊ लाख रुपये शिल्लक आहेत. यासह २०२५-२६ चा ६२ कोटी ४६ लाख १० हजार ५०० रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प स्थायी समिती व महापालिका सभेमध्ये मंगळवारी सादर केला. त्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
महापालिकेच्या दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर उपस्थित होते. महापालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागाकडे वृक्षकर, वृक्षतोड लाकूड विक्री, अनुदान, देणगी, झाडतोड खर्च वसुली, रोपे विक्री, विनापरवाना झाडे तोडल्याबाबत नागरिकांकडून वसूल केलेली तडजोड रक्कम, महापालिका सेवा शुल्क आदी बाबींच्या माध्यमातून ६२ कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा होणार आहेत. ही वृक्षसंवर्धन विभागाचे विविध उपक्रम व विकासकामांसाठी खर्च करण्यात येणार आहे. त्यामध्ये कार्यालयीन खर्चासह फळाफुलांचे प्रदर्शन भरविणे, झाडांचे पुनर्रोपण करणे, पिंजरे खरेदी व दुरुस्ती करणे, वृक्षगणना करणे, तार कुंपण देखभाल दुरुस्ती करणे, विविध उद्यानांची देखभाल दुरुस्ती करणे, गायरान व मोकळ्या जागांमध्ये वृक्षरोपण व संवर्धन करणे, नर्सरी साहित्य खरेदी करणे आदी कामांचा समावेश आहे.

असा आहे अर्थसंकल्प
२०२४-२५ ची शिल्लक ः ५ कोटी ९ लाख २४ हजार ५०० रुपये
२०२५-२६ अपेक्षित जमा ः ५७ कोटी ३६ लाख ८६ हजार रुपये
२०२५-२६ एकूण जमा ः ६२ कोटी ४६ लाख १० हजार ५०० रुपये

‘स्थायी’ची मान्यता मिळालेले अन्य विषय
- शहरातील तृतीयपंथी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थेस अर्थसहाय्य योजना राबविणे
- किवळे सर्वे क्रमांक ८८ येथील आरक्षण क्रमांक ४/१४५ येथे भारतरत्न राष्ट्रीय उद्यान विकसित करणे
- महापालिकेच्या कासारवाडी प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविणे
- महापालिका पर्यावरण विभागाच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता मंजूर पदांच्या संख्येत एकने वाढ करणे
- चिखली मोरेवस्ती, म्हेत्रे वस्ती भागातील अरुंद रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करणे
- चिखली शेलारवस्ती, मोरेवस्ती, चिंचेचा मळा भागातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

Viral Video: IT मॅनेजरची लाखोंची नोकरी सोडली; आता ऑटो चालवून महिला कमावते 60 हजार, कारण ऐकून थक्क व्हाल!

अभिषेक बॅनर्जींनंतर TMCच्या खासदाराला मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत; भाजप म्हणते हे नाटक

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT