पिंपरी-चिंचवड

संवाद माझा

CD

‘डीपी’चा दरवाजा सहा महिन्यांपासून उघडाच
रावेत येथील स्वस्तिक सृष्टी, चंद्रभागा कॉर्नर येथील महावितरणच्या डीपीचा दरवाजा मागील सहा महिन्यांपासून बसवण्यात आलेला नाही. याबाबत तक्रार देऊनही फायदा झालेला नाही. यामुळे लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. हा परिसर देहूरोड महावितरण कार्यालयांतर्गत येतो. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
- सुनील चाळक, रावेत
PNE25V43030

साई चौकातील पुतळ्याची दुरवस्था
नवी सांगवी येथील साई चौकातील बालिकांच्या पुतळ्याची दुरवस्था झाली आहे. या पुतळ्याची साफसफाई व रंगरंगोटी करणे गरजेचे आहे. या पुतळ्याकडे पालिका प्रशासन लक्ष देत नाही. तरी येथील पुतळ्यांची साफसफाई केल्यास परिसरात प्रसन्नता वाटेल.
-प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE25V43029

झाड पडल्याने नुकसान, गैरसोय
नवी सांगवी येथील साई चौकात भारत पेट्रोलियम पंपजवळ एक झाड पडले आहे. यामुळे वाहतूक आणि परिसरातील नागरिकांना गैरसोय होत आहे. विशेषतः पिंपळे गुरव आणि नवी सांगवी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार झाडे पडत असल्याच्या घटना घडत आहेत. या मध्ये जीवितहानी झाली नसली, तरी पीएमपी बसस्थानकाचे नुकसान झाले आहे.
- अभिजीत शेजवळ, नवी सांगवी
PNE25V43031

खोदलेला पदपथ पूर्ववत करणे आवश्यक
नेहरूनगर अण्णासाहेब मगर स्टेडियम जलतरण तलावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते वाहनतळापर्यंत ३० दिवसांपासून पदपथ खोदून सांडपाणी वाहिनी टाकण्यात आली आहे. तर, पेव्हिंग ब्लॉक इतरत्र टाकण्यात आले आहेत. सदर काम रोलिंग करून डांबरीकरण आणि पेव्हिंग ब्लॉक बसवणे पूर्ववत करणे आवश्यक आहे. सारथी हेल्पलाइनवर तक्रार टाकून दहा दिवस झाले, तरी सुद्धा काम पूर्ण झाले नाही.
- सुखदेव मुरलीधर म्हस्के, रुपीनगर

25V43028

रस्ता दुरुस्त करा किंवा पर्याय द्या
शास्त्रीनगर-रहाटणी फाटा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मोठे दगड-गोटे आणि चिखलयुक्त रस्त्यामुळे नेहमी छोटे-मोठे अपघात होत असतात. या भागात दुचाकींचा नेहमीच अपघात होते. या परिसरातील सर्व गल्ल्यांत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे. पण, येथील हा एकमेव रस्ता दुरुस्तीविना ठेवण्यात आला आहे. शासनाने लवकर लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी. किंवा परिसरातील नागरिकांना तुकडोजी कॉलनीतून रहाटणी फाट्याकडे विरुद्ध बाजूने जाण्यास रीतसर परवानगी द्यावी.
- नरेंद्र पवार, शास्त्री नगर, रहाटणी फाटा
NE25V43027

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Ganeshotsav: शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणेशोत्सव नाही; 22 वर्षांची परंपरा खंडीत होणार!

MLA Rohit Pawar : शिरसाटांचा तत्काळ राजीनामा घ्या; बेकायदा जमीन वितरणप्रकरणी रोहित पवार यांची मागणी

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून रात्री दहा वाजता ८५१७ क्युसेकचा विसर्ग सुरु

Mumbai News : राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आठशे कोटींची कर्जे थकीत, गैरव्यवहाराचा संशय

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

SCROLL FOR NEXT