पिंपरी-चिंचवड

संवाद माझा

CD

तळेगाव नगरपरिषदेने
भक्कम चेंबर बसवावे
तळेगाव दाभाडे शहरातील तळेगाव स्टेशन विभागात कातवी रस्त्यावर गौरव पार्क इमारतीसमोरील चेंबर नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने अनेक वेळा दुरुस्त केले आहे. परंतु त्यावरून वाहने जाऊन ते वारंवार तुटते. याठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. विद्यार्थी वाहतूक कारणारी रिक्षा अडकून मोठा अपघात सुदैवाने टळला. याठिकाणी भक्कम आणि टिकाऊ असे झाकण टाकून चेंबर बसवून नगरपरिषदेने नागरिकांना दिलासा द्यावा.
- दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे
25V43397
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा
पिंपरी-चिंचवड लिंक रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ असंख्य भटकी कुत्रे असतात. भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या कुत्रे हल्ला करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे महापालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करावा.
- सां. रा. वाठारकर, चिंचवड
PNE25V43396
---
चेंबर तत्काळ दुरुस्त करा

धर्मराज स्टील ट्रेडर गेट क्रमांक ८३, ज्योतिबा नगर निगडी तळवडे परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेले गोल आकाराचे चेंबर तुटले आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस व पावसाळ्यात हा धोका जास्त वाढतो. नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये याकरिता तुटलेले चेंबर तत्काळ दुरुस्त करण्याची विनंती आहे.
- निर्गुण थोरे, तळवडे
-25V43393
अर्धवट पाडलेल्या इमारतीचा धोका
नाशिक फाटा येथे मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या पदपथावरील एक इमारत अर्धवट पाडलेली आहे. इमारतीचा काही भाग, बाहेर आलेले गज पदपथावरून जाणाऱ्यांसाठी धोकादायक ठरले आहेत. गंजलेल्या गड व काँक्रीटचा भाग कधीही कोसळेल, अशी भीती तेथून जाणाऱ्यांना वाटते. त्यामुळे यावर उपाययोजना करून महापालिकेने हा पदपथ सुरक्षित करणे गरजेचे आहे.
- सुनील ढोबे, मोशी
PNE25V43392
झाडांना खिळे मारू नका
अनेक संस्था आपल्या जाहिरातींचे फलक सार्वजनिक ठिकाणी महानगरपालिकेच्या झाडांवर लावतात. त्यासाठी झाडांना खिळे मारले जातात. त्यामुळे झाडांची नैसर्गिक वाढ खुंटते. अशी जाहिरात करणे बेकायदा आहे. हे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेने आपल्या यंत्रणेचा परिणामकारक वापर करावा.
- संजय मिस्त्री, निगडी
NE25V43391
ब्लॉक निघाल्याने उंदरांचा सुळसुळाट
महानगरपालिकाच्या संभाजीनगरमधील बर्ड व्हॅली येथील पदपथाची गेल्या दोन महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. जागोजागी ब्लॉक निघाले आहेत. त्यामुळे उंदरांचा सुळसुळाट वाढला आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना सकाळी फिरायला जाता येत नाही. ही बाब संबंधित ठेकेदाराच्या निदर्शनास आणून दिली असता नकारात्मक प्रतिसाद मिळाला. ठेकेदाराला फक्त नौकाविहारातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये रस दिसत असावा असे वाटते.
- अॅड. पी. एन. जाधव, मोहननगर
NE25V43390

पालकांच्या वाहनांमुळे त्रास

एसएनबीपी शाळेला आणि कोकणे चौकाला जोडणाऱ्या रस्त्यावर अनेकदा गर्दी असते. विशेषतः गल्लीत असलेल्या शाळा उघडण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी गर्दी वाढते. शाळेजवळील गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांनी पालकांच्या वाहनांच्या पार्किंगचे नियमन करावे, अशी विनंती शाळा व्यवस्थापनाला अनेकदा केली आहे. अनेकांनी तक्रारी केल्या आहेत, परंतु त्याचा परिणाम झालेला नाही. एसएनबीपी शाळेतील पालक रस्त्याच्या मधोमध वाहने लावतात. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होतो.

- साधू यादव, पिंपळे निलख
NE25V43388
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

Latest Maharashtra News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

World Cup 2011 Final मध्ये युवराजच्या आधी धोनीने फलंदाजीला येण्याचं खरं कारण काय? सचिन तेंडुलकरनेच सांगितलं सत्य

Selfie death: सेल्फीमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल; २७१ बळी, इतर देशांमध्ये काय परिस्थिती?

Pig: जगभरात सर्वाधिक वराह कोणत्या देशात आहेत? भारतातले कोणते राज्य आहे आघाडीवर?

SCROLL FOR NEXT