पिंपरी-चिंचवड

गणेशोत्सवाच्या निमित्ताने इच्छुकांची लगबग

CD

पिंपरी, ता. ३० ः आगामी महापालिका निवडणूकीसाठी इच्छुकांनी दहिहंडीपाठोपाठ गणेशोत्सवाचे निमित्त साधले आहे. आजी-माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुक वेगवेगळ्या मंडळांना भेटी देऊन मतदारांशी संपर्क साधत आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना तयार केली आहे. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यावर सुनावणी होईल आणि पुढील महिन्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. त्यामुळे महापालिका निवडणूक दिवाळीनंतर होणार, हे निश्चित आहे. मार्च २०२२ पासून ही निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी लांबणीवर पडली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुहूर्त लागला आहे.
त्यामुळे सर्वच पक्षांतील इच्छुकांनी मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे. त्यासाठी गणेशोत्सवाचा मुहूर्त साधण्यात आला. आपापल्या भागातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यक्रमांना प्रायोजकत्व देणे, पूर्ण वेळ उपस्थित राहाणे, आरतीला उपस्थिती लावणे अशा माध्यमातून इच्छुक मंडळी मतदारांशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
सोसायट्यांमध्ये उपस्थिती
शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांत मोठमोठे गृहप्रकल्प उभारले आहेत. तेथील मतदारांची संख्या वाढली आहे. जवळपास सर्वच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यांच्याही आरतीला इच्छुक हजेरी लावत आहेत. गणेशोत्सवानिमित्त सोसायटी स्तरांवर विविध स्पर्धांच्या आयोजनासही प्रोत्साहनही दिले जात आहे.
नव्या-जुन्यांची तयारी
या निवडणुकीसाठी माजी नगरसेवकांसह नव्या इच्छुकांची संख्याही जास्त आहे. विविध ठिकाणी, प्रदर्शनी भागात, गणेसोत्सवाच्या मंडप परिसरात त्यांचे शुभेच्छा फलक झळकले आहेत. . २०२२ मध्ये मुदत संपलेल्यांसह त्यापूर्वी माजी असलेले पदाधिकारीही तयारी करीत आहेत. त्यांनी सुद्धा मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे. त्यामुळे माजींसह बहुतांश नवीन चेहरे मंडळांच्या कार्यक्रमांना दिसत आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हत्ती-ड्रॅगन एकत्र येणं गरजेचं, सीमावादाचा परिणाम सबंधांवर होऊ नये; PM मोदी-जिनपिंग चर्चेत काय झालं? चीनने दिली माहिती

Viral Video: वाईड बॉलवर आधी स्वीच हिट अन् मग हिट विकेट; T20 मॅचमध्ये फलंदाज विचित्रपद्धतीने बाद

Manoj Jarange: राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेलं पोरगं, कुचक्या कानाचं; मनोज जरांगेंची खोच टीका

Latest Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली

Lover Killed Girl : सोशल मीडियावर महिन्याची ओळख, प्रियकराला भेटल्यानंतर तीचा खून केला अन् आंबा घाटात फेकला मृतदेह पण एक चूक...

SCROLL FOR NEXT