पिंपरी, ता. ५ : भोसरीतील खंडेवस्तीत १२ जणांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून एका तरुणाच्या घरात शिरून सामान अस्ताव्यस्त फेकले. रॉड, काठ्या हवेत फिरवून दहशत निर्माण करून तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी सूरज जाधव यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी ऋषीकेश लष्करे, साहिल तुपसौंदर, निखिल कांबळे आणि प्रेम शर्मा या चौघांना अटक केली. याशिवाय प्रतीक जावळे, प्रीतम जावळे, देवांश ऊर्फ ईल्या, शुभम उर्फ भुत्या शिंदे, अनुज कुमार, अनुज जाधव, प्रेम शिंदे आणि भुर्या अशा इतर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी
फिर्यादी घराबाहेर थांबले असताना जुन्या भांडणातून काही आरोपी रॉड आणि काठ्या घेऊन आले. आरोपींनी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या लोकांना धमकावले. घराबाहेर पडल्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या आई-वडिलांना शिवीगाळ करीत धमकी दिली.
------