सिंगापूरची संस्मरणीय सफर
मनोज एरंडे़
जागतिक मास्टर्स जलतरण स्पर्धेसाठी नुकताच सिंगापूरला जाण्याचा योग आला. श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मधुरा पाटील यांनी माझे स्वागत केले. तेव्हापासून एक संस्मरणीय सफर सुरू झाली. स्पर्धेचा मुख्य तसेच सरावाचा जलतरण तलाव जवळच असणे स्पर्धकांप्रमाणेच प्रेक्षकांसाठी सोईचे ठरले. पाच हजारच्या घरात आसन क्षमता असल्याने प्रेक्षक आकर्षित झाले. सेल्फी पॉइंट्स, करमणुकीची साधने यांच्या जोडीला मातब्बर खेळाडूंची पोस्टर्स लक्ष वेधून घेत होती. सिंगापूर स्पोर्ट्स हबमधील तलावाच्या पाण्याचे तापमान २६ अंशापेक्षा जास्त नसेल याची खास व्यवस्था होती. वयोगट २५ ते २९ पासून थेट ९० ते ९४ किलोपर्यंत होते. दोन स्पर्धक ९७ वर्षांचे होते. नव्वदीतल्या या तरुणांना बघून वेगळीच ऊर्जा लाभली. ९ ऑगस्ट हा सिंगापूरचा वर्धापन दिन असल्याने सर्वत्र सजावट होती. मॉल, मेट्रो स्थानकांवर स्वागताचे फलक होते. अनेक ऑलिंपियन, जागतिक आणि आशियाई विजेत्यांच्या सहभागामुळे उत्सुकता निर्माण झाली होती.
सरावासाठी जो तलाव होता त्यात ६५ वर्षांवरील स्पर्धकांसाठी एक lane राखीव होती आणि special childs sathi वेगळा रॅम्प उपलब्ध केलं होता त्यामुळे ते विजेत्यांना सहज पाहू शकत होते.
या स्पर्धेत ३० जागतिक, तर तब्बल १२८ स्पर्धा विक्रमांची नोंद झाली. भारतीय खेळाडूंत बॅकस्ट्रोकमध्ये रोहित हवालदारने (३५-३९ वयोगट) रौप्य, तर अरविंदने (३१-३४) ब्राँझ पदक मिळविले.
हे क्रीडासंकुलाचे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आहे. फुटबॉल स्टेडियमशिवाय एक शॉपिंग मॉल आहे. तेथील दुकाने भाड्याने दिली आहेत. आपल्याकडे अशा संकल्पनेचा अवलंब व्हावा. स्टेडियममध्ये एक ट्रॅक आहे, जो सर्वांसाठी खुला आहे. यामुळे लोक व्यायाम, सायकलिंगसाठी येतात.
(लेखक श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचे मानकरी आहेत.)
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.