
Nepal’s Gen Z protesters rally against social media ban; police crackdown leaves 20 dead as Home Minister Ramesh Lekhak resigns.
esakal
Nepal Social Media Ban Gen Z Protest Update: नेपळामधील परिस्थिती अतिशय बिघडलेली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदीविरोधात झेन झी कडून सुरू झालेल्या तीव्र अन् हिंसक आंदोलनात आतापर्यंत २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे नेपाळमध्ये प्रचंड अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे, सरकावर जोरदार टीका सुरू आहे. अशातच आता नेपाळच्या राजकारणातही भूकंप घडला आहे. एकीकडे जोरदार निदर्शने सुरू असताना, दुसरीकडे थेट गृहमंत्र्यांनीच राजीनामा दिला आहे.
अकल्पनीय नुकसान, मी नैतिक आधारावर राजीनामा देतो असं म्हणत नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी आपत्कालीन मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे.
गृहमंत्री रमेश लेखक यांनी काँग्रेस अधिकाऱ्यांना एका बैठकीत कळवले आहे की ते नैतिक आधारावर राजीनामा देत आहेत. त्यांनी सांगितले की सोमवारच्या निदर्शनात अकल्पनीय जीवितहानी झाली आहे. दरम्यान, निदर्शनांच्या दरम्यान, सरकार या सोशल मीडिया अॅप्सवरील बंदी उठवू शकते.
सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना स्थानिक नोंदणीची मागणी केली होती आणि जेव्हा या कंपन्यांनी नोंदणी केली नाही, तेव्हा सरकारने त्यांना बंद केले, त्यानंतर मग देशभरात निदर्शने सुरू झाली. सरकारचे म्हणणे आहे की या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट बातम्या पसरवल्या जात आहेत आणि सायबर गुन्हे वाढत आहेत, म्हणून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
तर पंतप्रधान केपी शर्मा ओली म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाशी छेडछाड होऊ दिली जाणार नाही. ते म्हणाले की देशाची प्रतिष्ठा आणि कायदा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचे हेच कारण होते.
सरकारने तर आपली कारणे योग्य असल्याचे म्हटले आहे. परंतु नेपाळमधील तरुणांना वाटले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यामागे सरकारचा आणखी काही वेगळा विचार आहे. कारण सोशल मीडिया हे त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाला आहे असे त्यांना वाटल्याने तरुण रस्त्यावर उतरले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.