पिंपरी-चिंचवड

द्रुतगतीवर कारवाई वाढली परंतु परिस्थिती ‘जैसे थे’

CD

सोमाटणे, ता. ८ ः ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’ मुळे द्रुतगती मार्गावरील नियम मोडणाऱ्या वाहनावरील कारवाई वाढली आहे. परंतु पोलिसांची भीती नसल्याने नियम मोडणारे बिनधास्त झाले आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना जरब बसावी, त्यांनी नियमाचे पालक करावे, यातून होणाऱ्या अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी रस्तेविकास महामंडळाने कॅमेरे बसवले आहेत. पूर्ण ९५ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जुलै २०२४ रोजी आयटीएमएस प्रणाली बसवण्यात आली होती. ही प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता स्वयंचलित कॅमेऱ्याच्या साहाय्याने बसविली आहे. याचे नियंत्रण कुसगाव येथील नियंत्रण कक्षातून केले जाते.
यामध्ये नियम मोडणाऱ्या वाहनचालकाची माहिती परिवहन विभागाकडे जाते त्यानंतर संबंधित विभागाकडून ई-चलनाद्वारे दंड आकारला जातो. यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांची कारवाईतून सुटका नाही, परंतु हा दंड तातडीने द्यावे लागत नसल्याने वाहनचालकाची मुजोरी वाढत चालली आहे.

वेग मर्यादेचे उल्लंघन, लेन कटिंग, सीट बेल्ट न वापरणे, प्रवेश बंद मधून वाहने घेऊन जाणे इत्यादी नियम मोडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. द्रुतगती मार्गावर हलक्या वाहनासाठी वेग मर्यादा ताशी १०० किलोमीटर तर अवजड वाहनासाठी ८० किलोमीटर आहे. बोरघाटात हलक्या वाहनासाठी ताशी ६० किलोमीटर तर जड वाहनासाठी चाळीस किलोमीटर आहे. घाटात या वेग मर्यादेचे सर्रास उल्लंघन होते. टोलनाका स्थलांतरित झाल्याने सोमाटणे, उर्से येथील प्रवेश मार्गावरुन उलट्या दिशेने वाहने घुसवू नये यासाठी कॅमेरे बसवण्यात आले. परंतु प्रवेश बंद मधून वाहने नेताना काही वाहनचालक वाहनाची नंबर प्लेट झाकण्याचा प्रकार करतात.
नियंत्रण कक्षातून घेण्यात आलेल्या माहितीनुसार वर्षभरात नियम मोडणाऱ्या २७ लाख ७६ हजार वाहनावर ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली. तसेच ४७० कोटीचा दंड ठोठावण्यात आला. आयटीएमएसमुळे दंडात्मक कारवाई वाढली, परंतु नियम मोडणाऱ्या वाहनांचे प्रमाण कायम आहे.

Smt7Sf1.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर जैन बोर्डिंगचा जमीन खरेदी व्यवहार रद्द, गोखले बिल्डर्सचा मोठा निर्णय

Highway Traffic: संपली सुटी; महामार्गावर प्रवाशांची गर्दी; कोल्हापूर नाका, मलकापुरात वाहनचालक वैतागले..

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात स्वादिष्ट पनीर अँड व्हेजी कबाब ट्राय केलेत का? सोपी आहे रेसिपी

यंदा पाणी टंचाई नाही! पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची भूजल पातळी सव्वादोन मीटरने वाढली; माढा, मोहोळ, उत्तर सोलापुरात सर्वाधिक वाढ; उजनी धरण १०० टक्के

Pune Heavy Rain: मेघगर्जनेसह पावसाची जोरदार हजेरी; पुणेकरांची तारांबळ, ठिकठिकाणी रस्त्यावर साचले पाणी

SCROLL FOR NEXT