पिंपरी-चिंचवड

रिपाइंला शहरात पाच जागा सुटणार?

CD

पिंपरी, ता. २८ : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व रिपाइं (आठवले) पक्षाच्या महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सोमवारी (ता. २९) सुटण्याची चिन्हे आहेत. महायुतीकडे रिपाइंने भाजपकडे १५ जागांची मागणी केली होती. परंतु; रिपाइंला पाच जागा सुटणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

भाजपचे निवडणूक प्रचार प्रमुख, आमदार शंकर जगताप रविवारी (ता. २८) मुंबईला तातडीने गेले असून प्रदेश भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा करणार आहेत. त्यानंतर याबाबतचा निर्णय होणार आहे. याबाबत रविवारी रात्री बारानंतर जगताप व रिपाइंचे स्थानिक नेते यांच्यात बैठक होणार असून त्यानंतर जागा वाटपाचा तिढा सुटण्याची चिन्हे आहेत. रिपाइंला दापोडी प्रभाग क्रमांक ३०, किवळे प्रभाग क्रमांक १६, पिंपरी गाव-मिलिंदनगर प्रभाग क्रमांक २१, गांधीनगर-मासुळकर कॉलनी प्रभाग क्रमांक ९ व वाकड प्रभाग क्रमांक २५ या जागा सुटण्याची शक्यता असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. या सर्व प्रभागांमधील अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव असलेल्या ‘अ’ जागेवरील उमेदवार रिपाइंचे असणार आहेत. मागील निवडणुकीप्रमाणेच हे सर्व उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावरच लढणार असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

Latest Marathi News Live Update : मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सर्वधर्म रोजा इफ्तारचे आयोजन

स्वच्छता कंत्राटदारांना बसणार लगाम; आता नगरसेवकांच्या शिफारसीनंतरच मिळणार देयके, 'या' महानगरपालिकेचा मोठा निर्णय...

Pune Flyover Video: उड्डाणपुलाच्या कामात तांत्रिक चूक? 'आप'ने शेअर केला विद्यापीठ चौकातील नवीन पुलाचा व्हिडीओ

Thane News : ...तर पालिका अधिकाऱ्यांच्या घरात आंघोळीला जावे लागेल - अभिजीत पवार

SCROLL FOR NEXT