पिंपरी-चिंचवड

तरुणाला बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा

CD

पिंपरी : रागाने बघण्‍याच्‍या कारणावरून झालेल्या वादातून तीन जणांनी तरुणाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. ही घटना पिंपरीतील रमाबाईनगर येथे घडली. अक्षय राजकुमार साबळे (रा. रमाबाईनगर, पिंपरी) असे मारहाणीत जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव असून, याप्रकरणी त्‍यांनी पिंपरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तुषार साळवे (रा. बौद्धनगर, पिंपरी), तुषार म्‍हस्के (रा. भाटनगर, पिंपरी) आणि सरोज वाघमारे यांच्यावर गुन्‍हा दाखल केला आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र शाहरुख कुरेशी हे रस्त्यावर उभे असताना तेथे आरोपी सरोज वाघमारे आला. त्यांच्यात रागाने बघण्‍याच्‍या कारणावरून वाद झाला. त्यानंतर सरोजने त्याचे साथीदार तुषार साळवे व तुषार म्‍हस्के यांना बोलावून आणले. तिघांनी मिळून फिर्यादी व त्याच्या मित्राला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुषार साळवे याने बांबूने फिर्यादी यांना बेदम मारहाण केल्‍याने ते गंभीर जखमी झाले.

डेबिट कार्डाची माहिती घेऊन फसवणूक
पिंपरी : फोनवरून बँकेचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगून महिलेकडून डेबिट कार्डची माहिती घेत साडेचार लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार पिंपरीतील मासुळकर कॉलनी येथे घडला. या प्रकरणी एका महिलेने संत तुकाराम नगर पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांना त्यांच्या जावयाने दिलेला धनादेश जमा करण्यासाठी गुगलवर बँकेचा नंबर शोधला. त्यावर फोन केल्यानंतर समोरील व्यक्तीने स्वतः एका बँकेचा मॅनेजर असल्याचे सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपीने खाते क्रमांक व डेबिट कार्डची माहिती मिळवली. त्यानंतर त्यांच्या खात्यातील परस्पर चार लाख ५० हजार रुपये काढून फसवणूक केली.

दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी
पिंपरी : भरधाव दुचाकीने धडक दिल्‍यामुळे एक तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी दुचाकीचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मोशीतील आल्हाटवाडी येथे घडली. आदित्य उद्धव पाटोळे (रा. बनकर वस्‍ती, मोशी) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी तरुणाच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा मुलगा मोशी-आळंदी रस्त्यावरील आल्हाटवाडी येथील रस्ता ओलांडत असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकीने तरुणाला जोरात धडक दिली. यामध्ये तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

Farmer News: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या विशेष कृती दलासोबत शेतकरी कृती समितीचे एसबी पाटील यांची चर्चा

Pune Crime: बायकोचा छळ टोकाला! नवऱ्याने चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; पुण्यात धक्कादायक घटना

Investment Fraud Case : फसवणुकीचा धक्कादायक प्रकार : ५२ गुंतवणूकदारांना १.५९ कोटींचा फटका!

Pachod News : पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या युवकाचा दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT