पिंपरी-चिंचवड

‘माझे कॉलेज, माझी स्वच्छता’ उपक्रम ‘एटीएसएस’मध्ये उत्साहात

CD

पिंपरी, ता. ६ ः ‘सकाळ’ यिन कल्बच्यावतीने एटीएसएस कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज अँड कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये ‘माझे कॉलेज, माझी स्वच्छता’ हा जनजागृतीपर उपक्रम उत्साहात झाला.
उपक्रमाचे उद््घाटन अध्यक्षा डॉ. दीपाली सवई आणि सचिव डॉ. अश्विनी कुलकर्णी यांनी केले. त्यांनी हिरव्या रंगातील अंगठ्याचे ठसे फलकावर उमटवून शुभारंभ केला. हिरवा रंग विकास, स्वच्छता आणि पर्यावरणीय जबाबदारीचे प्रतीक आहे. प्रशासनाचे प्रतिनिधी डॉ. रणजित पाटील यांनी स्वच्छतेचे महत्त्व आणि युवकांचा सक्रिय सहभाग यावर प्रेरक मार्गदर्शन केले.
या उपक्रमात १२० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महाविद्यालय संपूर्ण परिसर पथदर्शी पद्धतीने स्वच्छ करण्यात आला. त्यांतून दृश्यात्मक सामाजिक संदेश गेला. काही विद्यार्थ्यांनी आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक वातावरणातील स्वच्छतेचे महत्त्व आणि योगदान यावर भाष्य केले.
प्राचार्य डॉ. विश्वास स्वामी आणि आयक्युएसी समन्वयक डॉ. विनया केसकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. स्वच्छतेच्या सवयी नियमितपणे अंगीकारण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी ‘एकत्र येऊन अभिमानाने म्हणूया ‘स्वच्छ परिसर, सुंदर कॉलेज!’ अशी प्रतिज्ञा घेतली.
पिंपरी चिंचवडचे यिन अधिकारी चेतन लिम्हण यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ‘सकाळ’ यिन कॉलेज समन्वयक श्रुती थोरात यांनी समन्वय केला.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT