पिंपरी-चिंचवड

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी

CD

पिंपरी, ता. ७ : ‘‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,’’ अशी सूचना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी, नागरिकांसाठी यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता अनिल भालसाकळे, माणिक चव्हाण, उपायुक्त सचिन पवार यांच्यासोबत विविध स्वसंसेवी संस्था, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, मूर्तीकार व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

पीओपी मूर्तींसाठी वेगळे हौद
यंदाच्या गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेचा दर्जा वाढवण्यासाठी महापालिकेने कृत्रिम हौदांची संख्या १६ वरून ३२ करण्यात येत आहे. विशेषतः शाडू मातीच्या मूर्तींसाठी १६ नवीन कृत्रिम हौद उभारले जाणार आहेत. पीओपी मूर्तींसाठी स्वतंत्र हौदांची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे मूर्तींचे योग्य वर्गीकरण, पर्यावरणपूरक विसर्जन यांचे व्यवस्थापन शक्य होईल. मूर्ती विक्रेत्यांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

‘पुनरावर्तन’ मोहीम राबवली जाणार
‘पिंपरी चिंचवड महापालिकेत यंदा गणेशोत्सव काळात इको एक्झिस्ट फाउंडेशन या संस्थेच्या मदतीने ‘पुनरावर्तन’ मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत शाडू मातीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर ती माती पुन्हा संकलित करून मूर्तिकारांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे. त्यानंतर मूर्तिकार ती माती पुन्हा मूर्तीसाठी वापरू शकणार आहेत.


पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना महापालिकेच्या प्रत्येक विभागाने या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. पीओपी आणि शाडू मातीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. नागरिकांनीदेखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य देऊन सहकार्य करावे.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : 'तू हफ्ता कसा देत नाही बघतो' म्हणत पोलिसांनी विक्रेत्याला केली बेदम मारहाण; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही पाहा

Khokya Bhosale : खोक्या भोसलेला जामीन मंजूर, तीनपैकी एका गुन्ह्यात दिलासा

Gulf Of Mexico: गल्फ ऑफ मेक्सिकोचे ‘गल्फ ऑफ अमेरिका’ नामांतर; डेस्टीनच्या किनाऱ्यावर ट्रम्प थीम वस्तूंची विक्री जोमात

Thackeray Group Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गट शून्य झाला तरी अंतर्गत वाद मिटण्याचे नाव नाही, उद्धव ठाकरे आव्हान पेलणार का?

खुशखबर! Samsung Galaxy S24 Ultra स्मार्टफोनवर चक्क 50 हजारचा डिस्काउंट, ऑफर पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT