पिंपरी-चिंचवड

‘डिजिटल अरेस्ट’साठी ज्येष्ठ नागरिकांना ‘लक्ष्य’

CD

पिंपरी, ता. २२ : सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ हा प्रकार वेगाने वाढत असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना ‘लक्ष्य’ करून गुन्हेगार हे गुन्हे करत असल्याचे समोर येत आहे. स्वतः पोलिस अधिकारी, सीबीआय, कुरिअर कंपनी किंवा बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून हे गुन्हेगार व्हिडिओ कॉल करून पीडितांना घाबरवतात आणि त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालतात. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत अशा प्रकारच्या २६ घटनांची नोंद झाली आहे. यातील बहुतांश घटना ज्येष्ठ नागरिकांबाबत घडल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती घालून दोन कोटी ८० लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील सात आरोपींना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी मागील आठवड्यात अटक केली.

डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?
पोलिसांच्या गणवेशातील तोतया पोलिस अधिकारी, सीबीआय अधिकारी, नार्कोटिक्स डिपार्टमेंट, आरबीआयचे अधिकारी बोलत असल्याचे भासवत नागरिकांना व्हाट्सअप, टेलिग्राम यावर व्हिडिओ कॉल करून अटक करण्याची भीती दाखवतात. त्यानंतर ऑनलाइन पैसे पाठविण्यास भाग पाडून त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते.

अशी केली जाते फसवणूक
- तुमच्या नावावर गुन्हा नोंद झाल्याचा खोटा आरोप
- ड्रग्स, मनी लॉन्ड्रींग, पार्सल फसवणूक केसची व डिजिटल अरेस्टची धमकी
- फोन बंद न करण्याचा दबाव
- सतत व्हिडिओ कॉलवर ठेवून भीती निर्माण करणे
- त्यानंतर बँक खात्यांची माहिती मागणे
- मोठ्या रकमेचे ऑनलाइन ट्रान्स्फर करून घेतात
- केवायसी/ओटीपी देण्यास भाग पाडतात
---
ज्येष्ठ नागरिक का होतात शिकार?
- तंत्रज्ञानाची मर्यादित माहिती
- अचानक आलेल्या आरोपांना घाबरणे
- सरकारी अधिकाऱ्यांवर अतिविश्वास
- घरात एकटे असण्याची शक्यता जास्त
---
ही काळजी घ्या
- अशा कॉल्सना लगेच प्रतिसाद देऊ नका.
- फोनवर घाबरवणारे आरोप झाले तर तत्काळ फोन बंद करा.
- कोणतीही वैयक्तिक माहिती, ओटीपी, खाते क्रमांक देऊ नका.
- त्यांनी पाठविलेले लिंक क्लिक करू नका किंवा कोणतेही सोशल मीडिया ॲप डाऊनलोड करू नका.
- फसवणूक झाल्यास किंवा संशयास्पद कॉल आल्यास सायबर हेल्पलाइन १९३० या क्रमांकावर अथवा www.cybercrime.gov.in यावर तातडीने संपर्क साधा.
---
‘‘कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट असा काहीही प्रकार नाही. कोणताही सरकारी अधिकारी कधीही व्हिडिओ कॉलवर अटक, डिजिटल अरेस्ट किंवा दडपशाही करत नाही. अज्ञात कॉलवरून भीती दाखवल्यास फोन तत्काळ बंद करा. सायबर हेल्पलाइन १९३० अथवा जवळच्या पोलिस ठाण्याशी तत्काळ संपर्क साधावा. हा सर्व आभासी प्रकार आहे.
- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या घटना
महिना घटना
मार्च - २
एप्रिल - ५
मे- १
जून - १
जुलै- २
ऑगस्ट- ५
सप्टेंबर- २
ऑक्टोबर - ५
नोव्हेंबर - ३
एकूण २६
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT