पिंपरी-चिंचवड

शहरात स्वच्छता अन् सौंदर्याचा नवा आयाम

CD

पिंपरी, ता. २४ ः पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता आणि सौंदर्यनिर्मिती यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ‘टाकाऊ वस्तूंपासून सर्जनशीलता’ या संकल्पनेला नवचैतन्य देत, शहरातील टाकाऊ वस्तूंमधून आकर्षक कलाकृती निर्मितीचा उपक्रम राबवला आहे. या वस्तू पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता उपक्रमास चालना देत आहेत.
शहरातील विविध कचरा संवेदनशील ठिकाणी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे. यामध्ये प्रभाग १७ बिजलीनगर, प्रभाग २२ शांती चौक काळेवाडी, प्रभाग ५ सखूबाई गवळी उद्यान, आळंदी रोड, भोसरी येथे असलेली संवेदनशील ठिकाणे आता रंगतदार, देखण्या कलाकृतींनी सुशोभित झाली आहेत.
आरोग्य विभागाच्या सफाई सेवकांनी या परिसराची स्वच्छता करण्यासोबतच टाकाऊ टायर, प्लॅस्टिकचे डबे, बाटल्या, लोखंडी फ्रेम्स, पाइप्स यांसारख्या वस्तूंचा कल्पकतेने उपयोग करून उद्याने, रस्त्याकडील जागा आणि सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण केले. या उपक्रमासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य विभाग प्रमुख व उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, आरोग्य कार्यकारी अधिकारी व सहायक आयुक्त अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश भाट, सुधीर वाघमारे, श्रीराम गायकवाड, अतुल सोनवणे, भूषण शिंदे, रूपाली साळवे, मुकेश जगताप, विकास शिरवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

महापालिकेची ही कलात्मक मोहीम इतर शहरांसाठीही प्रेरणादायी ठरत असून पुढील काळात अशाच अनेक सुशोभीकरण प्रकल्पांचे नियोजन सुरू आहे. टाकाऊ वस्तूंच्या कल्पक वापरातून पिंपरी चिंचवड शहर स्वच्छता आणि सौंदर्याचा नवा आदर्श निर्माण करत आहे.
-डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आरोग्य विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

Farmer News: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या विशेष कृती दलासोबत शेतकरी कृती समितीचे एसबी पाटील यांची चर्चा

Pune Crime: बायकोचा छळ टोकाला! नवऱ्याने चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; पुण्यात धक्कादायक घटना

Investment Fraud Case : फसवणुकीचा धक्कादायक प्रकार : ५२ गुंतवणूकदारांना १.५९ कोटींचा फटका!

Pachod News : पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या युवकाचा दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT