पिंपरी-चिंचवड

बांधकाम कामगाराच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदार, सुपरवायझरवर गुन्हा

CD

पिंपरी, ता. ७ : निर्माणाधीन बांधकाम प्रकल्पाच्या आठव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी कंत्राटदार व सुपरवायझरवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना १ ऑगस्ट २०२४ रोजी पुनावळेतील ढवळेनगर येथे घडली होती. तक्रार अर्जाच्या चौकशीनंतर सोमवारी (ता. ६) या प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जसवंत मुकुंदा यादव (वय ३०, रा. पुनावळे) असे या घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी संतोष मुकुंदा यादव (वय ३९, रा. छत्तीसगड) यांनी रावेत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यानुसार कंत्राटदार आनंद मारुती गाडे (वय ४७, रा. मधुबन सोसायटी, जुनी सांगवी, मूळ- बीड) आणि सुपरवायजर देवप्पा आयप्पा अंबीगर (वय ४२, रा. सूसरोड, पाषाण, मूळ-कर्नाटक) यांच्यावर ६ जानेवारीला रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी संतोष यांचे भाऊ जसवंत हे पुनावळेतील ढवळेनगर - २ येथील व्हीएमए प्रॉपर्टीजच्या अपना घर या बांधकाम प्रकल्पावर काम करत होते. तेथे कामगारांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना साई कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार गाडे यांनी केल्या नाही. तसेच सुपरवायझर अंबीगर यांनी कामगारांना सुरक्षा साधने आहेत किंवा नाहीत याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे यादव यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

Viral Video: IT मॅनेजरची लाखोंची नोकरी सोडली; आता ऑटो चालवून महिला कमावते 60 हजार, कारण ऐकून थक्क व्हाल!

अभिषेक बॅनर्जींनंतर TMCच्या खासदाराला मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत; भाजप म्हणते हे नाटक

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT