पिंपरी, ता. २४ ः चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (ता. २५) होणार आहे. या कार्यालयामार्फत सोसायटीधारकांच्या समस्या, प्रश्न आणि मागण्या सोडविल्या जाणार आहेत, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी सांगितली.
चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघ (सोसायटी फेडरेशन) या सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी काम करणाऱ्या सहकारी संस्थेची स्थापना एक ऑक्टोबर २०१६ रोजी शहरातील सोसायटीधारकांनी एकत्र मिळून केली. सोसायटी फेडरेशनची स्थापना झाल्यापासून या फेडरेशनच्या माध्यमातून सोसायटीधारकांच्या अनेक समस्या सोडविल्या. महापालिकेशी संबंधित पाणी, वीज, कचरा, रस्ते आदी समस्या तसेच शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी अनेक गृहप्रकल्पातील नागरिकांना दिलेली आश्वासन पूर्ण न करता प्रकल्प उभारले, तसेच समस्या सोडविल्या जातात.
सर्व समस्यांसाठी हक्काचे व्यासपीठ
सहकारी गृहनिर्माण संस्था अधिनियम १९६०, १९६१ नुसार सहकारी गृहरचना संस्था कशा चालवाव्यात याबद्दल फेडरेशनमार्फत मार्गदर्शन केले जाते. सोसायटी मेंटेनन्स, सोसायटी निवडणूक, ऑडिट, देखभाल खर्च वसुली, अशी अनेक कामे फेडरेशनच्या माध्यमातून करून दिली जातात. बांधकाम व्यावसायिकाकडून अपूर्ण राहिलेली सर्व काम फेडरेशनकडून करून दिली जातात. महापालिकेकडून कर आकारणी तसेच कचरा, पाणी, वीज याबाबतीतच्या असणाऱ्या सर्व समस्या फेडरेशनमार्फत सोडवल्या गेलेल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.