पिंपरी, ता. २४ : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील ८०१ अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे पडद्यावर (स्क्रीन) पोलिस ठाणे व इतर शाखांमधील रिक्त पदांचा तपशील दाखवून त्यांना त्यांच्या पसंतीनुसार बदलीचे ठिकाण निवडण्याची संधी देण्यात आली.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वरील बदल्या केल्या. पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या ज्या पोलिस अंमलदारांना ३१ मे २०२५ रोजी नेमणुकीच्या ठिकाणी ५ वर्षे पूर्ण होत आहेत, अशा अंमलदारांच्या बदल्यांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी पोलिस आस्थापना मंडळाची बैठक आयोजित करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार सर्वसाधारण बदलीसाठी पाच वर्षे पूर्ण झालेले उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हवालदार, नाईक व शिपाई यांना शुक्रवारी (ता. २३) निगडीतील पोलिस मुख्यालय येथे समक्ष उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते. येथे उपस्थित अंमलदारांना त्यांच्या पसंतीनुसार बदलीचे ठिकाण निवडण्याची संधी देण्यात आली. अशा पद्धतीने दोन दिवसांत गुन्हे शाखेत कर्तव्य करण्यास पात्र असलेले अंमलदारांचा सेवा अभिलेख पाहून ७९ जणांची गुन्हे शाखेत; तर पोलिस ठाणे व इतर शाखेत कर्तव्य करीत असलेले ७२२ जण अशा एकूण ८०१ पोलिस अंमलदारांच्या प्रशासकीय बदली करण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.