पिंपरी-चिंचवड

मीरा भाईंदरला विकासाचा ‘पिंपरी पॅटर्न’

CD

पिंपरी, ता. २५ ः मीरा भाईंदर महापालिका अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवडला भेट देऊन विविध प्रकल्पांची माहिती घेतली. महापालिकेत येऊन विविध विभागांतील उपक्रम व कार्यपद्धती समजून घेतली. पिंपरी-चिंचवडप्रमाणेच मीरा भाईंदरमध्येही विविध प्रकल्प राबविण्याचा मनोदय शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मीरा भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अतिरिक्त शहर अभियंता दीपक खांबीत, कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर, अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश बोरडे, सहाय्यक आयुक्त योगेश गुणिजन, स्वप्निल सावंत, प्रकल्प प्रमुख कैलास गिते, घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ अक्षय ढबाले, विनीत चौहान, रोहन घुले, उपआयुक्त कल्पिता पिंपळे, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, सहाय्यक संचालक पुरुषोत्तम शिंदे, सहाय्यक आयुक्त नरेंद्र चव्हाण आदींसह विविध विभागातील अधिकाऱ्यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
रस्ते विकास विभागाच्या जीआयएस प्रणालीद्वारे रस्त्यांचे मोजमाप व इतर विकासकामांची माहिती पथकाने घेतली. उद्यान विभागाच्या १९७ उद्यानांची माहिती व बायोडायव्हर्सिटी पार्क उपक्रमाचे कौतुक केले. समाज विकास विभागाच्या दिव्यांग भवन, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, लिनियर गार्डन, कासारवाडी जलःनिसारण प्रकल्प, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, सायन्स पार्क, पिंपळे गुरव डायनासोर पार्क अशा विविध कार्य पद्धतीची माहिती पथकाने घेतली.

पिंपरी-चिंचवडचे सादरीकरण
पिंपरी-चिंचवड महापालिका शहर अभियंता मकरंद निकम (रोड असिस्टंट ॲन्ड मॅनेजमेंट सिस्टीम), सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे (करसंकलन प्रणाली), उपआयुक्त अण्णा बोदडे (बचत गटाच्या माध्यमातून मालमत्ता कर पावती वितरण व झोपडपट्टी भागातून संकलित कर), मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण (संगणक प्रणाली), सहशहर अभियंता बापू गायकवाड (दळण वळण), पर्यावरण विभाग कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल (पर्यावरण, जलःनिसारण आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प), आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे (आरोग्य), उपआयुक्त प्रदीप ठेंगल (नागरी सुविधा केंद्र), प्रशासन अधिकारी संगिता बांगर (शिक्षण), सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे (उद्यान), उपआयुक्त राजेश आगळे (आकाशचिन्ह व परवाना), सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे (समाज विकास) यांनी संगणकीय पद्धतीने आपापल्या विभागाच्या कामांचे सादरीकरण केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच चोरी, मंत्र्याच्या कॅबिनमधून ८० हजार रुपये लंपास...

IPL 2026: हार्दिक पांड्या CSK कडून खेळणार? '०७:०७' पोस्ट अन् Mumbai Indians चा कॅप्टनची चर्चा... नेमकी भानगड काय?

Thane Crime: ‘प्रेम’ बनलं सापळा! १४० हून अधिक तरुणींची फसवणूक; ‘लव्ह स्कॅम’चा मास्टरमाइंड अटकेत

माझ्या नवऱ्यानेदेखील त्या बातम्या वाचल्या... मित्रांसोबत अफेअरच्या चर्चांवर पूजा सावंतने सोडलं मौन; म्हणाली-

Latest Marathi News Live Update : बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीं खरेदीकडे नागरिकांचा कल

SCROLL FOR NEXT