पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

मित्राला सिमेंटच्या गट्टूने मारहाण; एकावर गुन्हा

पिंपरी : मोबाईल फोन न विचारता नेल्यावर चापट मारल्याने मित्राने तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना वाकडमधील काळाखडक येथे घडली. या प्रकरणी अजय अमोल काणेकर (रा. वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी स्वराज उर्फ चैतन्य विशाल साळवे (वय १९, रा. वाकड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी अजय हे त्यांच्या मित्रांसमवेत त्यांचा नातेवाईक ऋषिकेश जाधव यांच्या घरी गप्पा मारत बसले होते. त्यावेळी अजय यांचा मित्र आरोपी स्वराज याने अजय यांचा मोबाईल फोन न विचारता परस्पर नेला. त्यामुळे अजय यांनी स्वराज याला चापट मारली. या कारणावरून स्वराज याने अजय यांना सिमेंटच्या गट्टूने मारून दुखापत केली.

पिस्तुले बाळगल्या प्रकरणी एकाला अटक
पिंपरी : बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई चिंचवडमधील रामनगर येथे करण्यात आली. प्रिन्सकुमार मुन्ना सिंह (वय २२, रा. बिबवेवाडी, पुणे, मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. रामनगर येथे एक तरुण पिस्तुल घेऊन आला असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रिन्सकुमार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार पाचशे रुपये किंमतीची दोन पिस्तुले आणि एक जिवंत काडतूस सापडले.

फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा
पिंपरी : वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून नेलेली मोटार परत न करता तिचा अपहार केल्याची घटना चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे घडली. या प्रकरणी सर्जेराव बिरा ढवळे (रा. आंबेठाण पठार, कात्रज) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन रमेश खिंवसरा आणि एक महिला (रा. मारुंजी, हिंजवडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी सर्जेराव हे त्यांचा मित्र धनंजय पुणेकर यांच्यासोबत चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी येथे थांबले होते. त्यावेळी त्यांच्या तोंडओळखीचे आरोपी सचिन आणि महिला यांनी त्यांच्या वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून सर्जेराव यांची चार लाख रुपये किंमतीची मोटार नेली. वर्ष उलटून देखील त्यांची मोटार परत न करता ढवळे यांची फसवणूक केली.


मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
पिंपरी : भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना मुंबई-बंगळुरू महामार्गावर रावेत येथे घडली. विठ्ठल जगन्नाथ मोरे (वय ५३, रा. अंकुश चौक, निगडी) असे या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा समीर विठ्ठल मोरे यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३६ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे वडील विठ्ठल मोरे हे हिंजवडी येथून निगडी येथे दुचाकीवरून येत होते. दरम्यान, रावेत येथे आल्यानंतर आरोपी महिलेने तिच्या ताब्यातील मोटारीने मोरे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मोरे यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलीला वाचवायला ५ जणांनी नदीत उड्या मारल्या, पाचही जण बुडाले, मुलगी वाचली

देऊळ बंद 2 ने रितेश देशमुखच्या सिनेमाला टाकलं मागं, 10 व्या दिवशी कोट्यवधीची कमाई, मध्यरात्रीचे शो सुद्धा हाऊसफुल्ल

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Latest Marathi News Live Update : प्रमुख मंदिरांच्या अधिकारांमध्ये मोठा बदल; धर्मदाय आयुक्तालयाकडे संपूर्ण सूत्रे

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात २१ दिवसांत ८६० गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई; पांगरमलसारख्या दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती कायम

SCROLL FOR NEXT