वास्तु शिल्पाची दुरुस्ती करा
जुनी सांगवीतील माकन चौकामध्ये वास्तु शिल्प आहे. त्याचे काही भाग पडून मोडले आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी महानगरपलिका लक्ष देत नाही. तरी लवकरात लवकरच दुरुस्ती करावी.
- मनोज पवार, पवारनगर, जुनी सांगवी
PNE25V49282
खड्डे टाळून वाहने चालविणे अवघड
पुणे - बंगळुरू महामार्गाशी जोडलेल्या सेवा रस्त्यावर भूमकर चौकाजवळील डब्ल्यूबीझ मॉल समोरच्या चौकात ५० मीटर अंतरावर २५ खड्डे आहेत. खड्ड्यांना सुरक्षितपणे टाळत गाडी चालवणे हे एक महाकार्य झाले आहे. हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
- जयश्री वर्तक, भूमकर चौक
PNE25V49281
पुणे - लोणावळा चौपदरीकरण कधी ?
पुणे - लोणावळापर्यंतचा साधारण ३० किलोमीटरचे लोहमार्ग चौपदरीकरण आज काही दशकांपासून प्रलंबित आहे. जुन्या रेल्वे डब्यांमधून सोयीसुविधा नसलेल्या जुन्या रेल्वे डब्यांमधून वेळापत्रक नसताना तास न तास लोकलची वाट पहात हजारो नोकरदार, विद्यार्थी, अपंग तसेच ज्येष्ठ नागरिक हा खडतर प्रवास प्रवास करीत आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, रेल्वे प्रशासन असे उदासीन का? या परिसरात आता बरेच कारखाने, कार्यालये कार्यरत आहेत. नवनवीन महविद्यालये उदयास येत आहेत. कामगार वर्ग, विद्यार्थी वाढत आहेत. सर्वांना अतोनात हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. ही समस्या सर्व थरांवर, राजकारण्यांसमोर मांडून झाली आहे. परंतु यश येत नाही. याचा विचार व्हावा.
- प्रकाश वा.दातार, तळेगाव दाभाडे
फोटो नाही.
सिमेंटचे स्लॅब त्रासदायक
गंगानगर प्राधिकरण सेक्टर नंबर २८ निगडी येथे बऱ्याच दिवसापासून हे सिमेंटचे स्लॅब रस्त्यावर आहेत. त्यामुळे शाळकरी मुले, नागरिक तसेच रहदारीला देखील त्रास होत आहे. तरीही ते लवकरात लवकर उचलावे. त्रासातून मुक्ती द्यावी.
- सिराज बशीर शेख, गंगानगर
PNE25V49279
यमुनानगरमधील राडारोडा उचला
यमुनानगरमधील महत्वाच्या व प्रमुख रस्त्यावर गेले दीड ते दोन महिन्यांपासून स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत वृक्ष लागवड केली जात आहे. अद्याप ती संपलेली दिसत नाही. झाडे लावण्याची तत्परता दाखविली गेली. मात्र, उकरुन ठेवलेला राडारोडा उचलणे बहुधा कंत्राटामध्ये लिहिले नसल्याने तसेच ठेवलेले असावे. पदपथावरील ही सजावट पाहण्याचा सुखद लाभ अजून किती दिवस आम्हाला मिळणार आहे ? माहीत नाही.
- प्रदीप पाटील, यमुनानगर, निगडी
PNE25V49280
मोठ्या खड्ड्याचा धोका
स्टॉप नं. १६ कडून कावेरीनगर पोलिस वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ॲक्सिस बॅंक एटीएमसमोर पदपथावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
- सुहास होनराव, कावेरीनगर
PNE25V49278
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.