पिंपरी, ता. १५ ः डेंगी व मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेतर्फे मोहीम राबवून घरोघरी तपासणी, कीटकनाशक फवारणी, जनजागृती आणि दोषींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. डासोत्पत्तीस कारणीभूत ठरल्याने गेल्या साडेतीन महिन्यांत चार हजार १३७ जणांना नोटीस बजावण्यात आल्या. त्यातील एक हजार १४२ जणांकडून ४० लाख ५८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकत्रित आराखडा तयार केला आहे. जनजागृती व स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. घरोघरी माहितीपत्रक वितरण, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आरोग्य व स्वच्छतेबाबत प्रशिक्षण, प्रभागस्तरीय विशेष कार्यक्रम, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा व कीटकनाशक फवारणी आदी उपक्रम महापालिका राबविले जात आहेत. याशिवाय आठवड्यातून एकदा दिवस कोरडा दिवस पाळावा, घराच्या परिसरात पावसाचे पाणी साचू देऊ नका, घर व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवा, असे आवाहन नागरिकांना केले जात आहे.
---
तपासणी व कारवाईचा तपशील
तपासणी / एकूण संख्या / डासोत्पत्ती ठिकाणे
घरे / ९,८०,३८० / १४,२७४
कंटेनर / ५१,८४,९७२ / १५,४०७
टायर, भंगार दुकाने / २,०११ / २,०११
बांधकाम स्थळे / २,२१३ / २,२१३
(कालावधी ः १ जून ते १४ सप्टेंबर)
---
डेंगी व मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांवर आळा घालण्यासाठी कीटकनाशक फवारणी, घरोघरी तपासणी, बांधकाम स्थळांची पाहणी, कंटेनर तपासणी यांसह जनजागृती मोहीम राबवली जात आहे. यामुळे डासांची उत्पत्ती कमी होऊन संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होत आहे. टायर, भंगाराची दुकाने व बांधकाम स्थळी स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.