पिंपरी-चिंचवड

विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या चित्रसंकल्पना

CD

पिंपरी, ता. १९ ः चित्रातील रंगसंगती, त्याची रचना कशी व किती आकारात असावी, स्थिरचित्र, स्मरणचित्र आणि संकल्प अशा चित्रांची व्याख्या नेमकी काय? अक्षरलेखन कसे असावे? अशा विविध मुद्द्यांविषयी कलाशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. निमित्त होते ‘सकाळ एनआयई’ व निगडीतील मातृमंदिर विश्‍वस्त संस्थेतर्फे आयोजित एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा कार्यशाळेचे.
निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या मनोहर वाढोकर सभागृहात ही कार्यशाळा झाली. कलाशिक्षक रमेश गाढवे, अशोक कामथे, शिवराम हाके यांनी ‘स्थिरचित्र, स्मरणचित्र, संकल्पचित्र, कर्तव्यभूमिती व अक्षरलेखन’ या विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. डिझाईन, आर्किटेक्चर यांसारख्या क्षेत्रासाठी या परिक्षा उपयुक्त आहेत. विद्यार्थ्यांनी अशा परीक्षांना आत्मविश्‍वासाने सामोरे जावे असे कलाशिक्षकांनी आवर्जून नमूद केले.
मातृमंदिर विश्‍वस्त संस्थेचे कोषाध्यक्ष शिवराज पिंपुडे, सहकार्यवाह सुधीर कुलकर्णी, महापालिका शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी संगीता बांगर-घोडेकर, कलाशिक्षक प्रदीप वकील, वर्षा जाधव यावेळी उपस्थित होते. ‘एनआयई’चे वरिष्ठ व्यवस्थापक विशाल सराफ यांनी संयोजन केले. कलाशिक्षक अशोक कामथे यांनी राज्य गुणवत्ता यादीत अकरावी आलेल्या तनिष्का ठाकूर व संकल्पचित्र विषयात राज्यात सातवी आलेल्या विधी बडेरा यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे पारितोषिक दिले.
सहभागी कलाशिक्षक ः अमृता भोईटे (शि. प्र. मंडळी शाळा, निगडी), माधुरी सासवडे, स्वाती देशपांडे (एसपीएम स्कूल निगडी), संजय शेलार, राकेश भुजबळ (ज्ञानप्रबोधिनी, निगडी), सुलभा मुंगी, मुस्कान शेख (आचार्य आनंद ऋषीजी स्कूल कासारवाडी), कीर्ती सोळंकी (मनोरम शाळा, केशवनगर), रोहिणी अत्रे (श्री गुरू गणेश विद्यामंदिर, निगडी), पूजा कोळेकर (श्री दादामहाराज नाटेकर पंचकोशाधारित विद्यालय, चिखली)
महापालिका शाळांमधील शिक्षक ः नेताजी घोलप (किवळे), लायप्पा राऊतराव (नेवाळेवस्ती), वैशाली देऊळकर (काळेवाडी मुले/मुली ५६/१), मुक्ता धोंगडे (थेरगाव ६०/१), राजू रोडे (निगडी २/१), स्वाती कांबळे (पिंपळे गुरव ५४), अपर्णा मोरे (मुले/मुली जाधववाडी), निर्मला वाघस्कर (नवनाथ दगडू साबळे विद्यालय भाटनगर), ऋतुजा पवार (नागू बारणे कन्या/मुले शाळा), कल्याणी सांबळे (चऱ्होली), कामिनी गोविंद (जाधववाडी), प्रशांत लोकरे (अहिल्याबाई होळकर सांगवी ४९).
---
विद्यार्थ्यांसाठी मौलिक सूचना
- भौमितिक साधनांचा काटेकोरपणे वापर करा
- रंग माध्यमांचा योग्य वापर करा
- वस्तुचित्राचे सूक्ष्म निरीक्षण, प्रमाणबद्ध रेखाटन करून छाया प्रकाशासह चित्र रंगवा
- प्रमाणबद्धता, रंगछटा, नावीन्यता, पोतनिर्मिती, परिपूर्णता, स्वच्छता या गोष्टींना प्राधान्य द्या
- कर्तव्यभूमिती, घनभूमिती, अक्षरलेखन यांसह जागेचे नियोजन करा
- स्मरणचित्रात मानवाकृती, प्रसंगोत्सव, दैनंदिन घटना यांचे प्रमाणबद्ध रेखाटन करून शेडिंगला महत्त्व द्या
- स्थिरचित्रात जलरंग, पारदर्शक, अपारदर्शक रंगीत पेन्सिल, ऑइल पेस्टल, वॅक्‍सक्रेऑन, विविध रंगांतील शाईचा वापरा
- संकल्पचित्रात नैसर्गिक, अलंकारिक आकार आणि कलात्मक कौशल्य वापरा
- चित्र पूर्ण व आकर्षक रंगवा
---

शासकीय चित्रकला परीक्षा हे केवळ माध्यम असून त्यातून भावी चित्रकार निर्माण झाले पाहिजेत. त्यांनी कला क्षेत्रात भरीव योगदान दिले पाहिजे. या हेतूने गेल्या पाच वर्षांपासून या कार्यशाळेचा उपक्रम सुरू आहे.
- शिवराज पिंपुडे, कोषाध्यक्ष, मातृमंदिर विश्‍वस्त संस्था, निगडी
---
विद्यार्थ्यांनी चित्रकला विषयाला केवळ परीक्षेपुरते पाहू नये. चित्रकला छंद व आवड म्हणून जोपासल्यास भविष्यात उत्तम चित्रकार घडतील. त्यामुळे ‘सकाळ एनआयई’च्या या उपक्रमाची विशेष प्रशंसा करावीशी वाटते.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका
---
कला कौशल्ये विकसित होण्यास व कल्पकता वाढण्यास परीक्षेमुळे
मदत होते. विद्यार्थ्यांमध्ये स्थिरता व एकाग्रता निर्माण होते.
दहावीच्या परीक्षेतील एकूण गुणांमध्ये चित्रकला परीक्षांचे सात (अ श्रेणी), पाच (ब) व तीन गुण (क) मिळतात. गुणवत्ता यादीत येण्यासाठी सर्व विषयांमध्ये अ श्रेणी अनिवार्य असते. पहिले शंभर विद्यार्थी गुणवत्ताप्राप्त घोषित केले जातात.
अशोक कामथे
----
एलिमेंटरी-इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चित्रकार, शिल्पकार, आर्किटेक्चर, ग्राफिक डिझायनर, व्यंगचित्रकार, एआय स्पेशालिस्ट, आर्टिस्ट, आर्ट एडिटर, कार डिझायनर अशा विविध संधी उपलब्ध आहेत. उपजत आणि आधुनिक कलेची सांगड घातल्यास भविष्यात उच्चपदावर जाण्याची सुवर्णसंधी असते. उपजत कलेला वाव देऊन स्वतःतील सृजनशीलता जागृत करून विद्यार्थ्यांनी शासकीय परीक्षांना सामोरे जावे. त्यांना यश नक्कीच मिळेल.
रमेश गाढवे
---
प्रत्येक कला आपल्याला आनंद देते. शालेय जीवनात चित्रकला वा अन्य स्पर्धा परीक्षांमुळे आत्मविश्‍वास निर्माण होतो. एलिमेंटरी व इंटरमिजिएट या शासकीय परीक्षा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी दिल्या पाहिजेत. त्यामुळे प्रत्येक विषयाचे बारकावे टिपता येतात. महत्त्वपूर्ण सूचनांचे पालन करण्याची क्षमता विकसित होते. कमी वेळेत अधिक प्रभावी काम करण्याची क्षमता वाढविण्यासाठीही अशा परिक्षांचा उपयोग होतो.
शिवराम हाके
....................----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda clarification : ''पाकिस्तानमध्ये मला घरासारखं वाटलं'' म्हणणाऱ्या सॅम पित्रोदांनी अखेर दिलं स्पष्टीकरण!

Woman Cries for Panipuri VIDEO : पाणीपुरीसाठी कायपण…! महिलेन थेट रस्त्यातच ठाण मांडत सुरू केलं मोठ्यानं रडण अन् मग...

IND vs OMN Live: ८ विकेट पडूनही सूर्यकुमार यादव फलंदाजीला का आला नाही? समोर आलं कारण...

Manipur: मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर हल्ला; दोन जवान हुतात्मा, छायाचित्रे व्हायरल

Pune Road Potholes : पुणेकरांची खड्ड्यातून मुक्ती नाहीच! सीसीटीव्हीसाठी ५५० किलोमीटरची रस्ते खोदाई होणार

SCROLL FOR NEXT