पिंपरी-चिंचवड

दिवाळीत गावी जाणाऱ्यांची यंदाही कसरत

CD

पिंपरी, ता. ६ : दिवाळीच्या सुट्टीत रेल्वेने गावी जाण्यासाठी तिकिटांचे बुकिंग करण्याचा प्रयत्न नागरिक करत आहेत. पण, नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण केव्हाच फुल्ल झाले आहेत. अनेक गाड्यांच्या तिकिटासाठी आताच प्रतीक्षा यादी अर्थात ‘वेटिंग’ दिसत आहे. काही मार्गांवरील ‘विशेष ट्रेन’मधील बहुतांश गाड्यांचेही आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे नागरिकांची गावी जाण्यासाठी कसरत अटळ आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातून शिक्षण, व्यवसाय आणि कामानिमित्त विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने पिंपरी चिंचवड, पुणे शहरात स्थायिक झाले आहेत. शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. त्यामुळे अनेकांची रेल्वे तिकीट आरक्षणासाठी धावपळ सुरू आहे. मात्र, सर्वच मार्गांवरील बहुतांश गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. नवीन तिकीट बुकिंग करताना १०० ते १५० ‘वेटिंग’ दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी वाहनांचीही चाचपणी सुरू केली आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार पुणे, खडकी आणि हडपसर रेल्वे स्थानकांतून विशेष रेल्वे सुटणार आहेत. या गाड्यांना पिंपरी किंवा चिंचवड स्थानकांवर थांबा नसल्याने प्रवाशांना पुणे, हडपसर किंवा खडकीपर्यंत जावे लागणार आहे.

- विशेष रेल्वे आणि सुटण्याची वेळ
पुणे ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) दररोज - रात्री ९.४०
हडपसर ते लातूर - प्रत्येक सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी - सायं. ४.०५
पुणे ते अमरावती - प्रत्येक मंगळवारी - सायं. ७.५५
पुणे ते नागपूर प्रत्येक रविवारी - दुपारी ३.५०
खडकी (पुणे) ते इंदूर - प्रत्येक गुरुवारी - सकाळी ५.१०
पुणे ते हजरत निजामुद्दीन, दिल्ली - प्रत्येक सोमवार व गुरुवार - सायं. ०५.३०
पुणे ते सांगानेर (जयपूर) - प्रत्येक शुक्रवारी - सकाळी ९.४५
पुणे ते सांगानेर - प्रत्येक गुरुवार व रविवार - सकाळी ९.४५
खडकी ते हिसार (हरियाणा) - प्रत्येक सोमवारी - सायंकाळी ५.००
हडपसर ते दानापूर - प्रत्येक सोमवारी - सकाळी ६.४५
हडपसर (पुणे) ते रीवा (मध्यप्रदेश) - २७ ऑक्टोबर सकाळी ६.४०

तत्काळ, प्रीमियम तत्काळचा पर्याय
तत्काळ तिकीट कोट्यातील अर्धा कोटा प्रीमियम तत्काळसाठी राखीव ठेवला जातो. तत्काळ तिकिटांचे बुकिंग फुल्ल झाल्यावर प्रीमियम तत्काळाचा कोटा सुरू होतो. यामध्ये प्रत्येक बुकिंगनंतर तिकिटाच्या किंमती वाढतात; पण जास्तीत जास्त मूळ तिकीट किमतीच्या ३० टक्केच जास्त पैसे आकारले जातात. रेल्वे सुटण्याच्या २४ तास आधी ही सुविधा सुरू होते. त्याचा पर्याय आता प्रवाशांसमोर आहे.

तिकीट खडकीवर सुविधा
रेल्वे जेथून सुटणार, त्या वेळेच्या २४ तास अगोदर सकाळी १० ते ११ या वेळेत थ्री टिअर एसी, २ टिअर एसी, १ क्लास एसी, चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे, तर ११ ते १२ या वेळेत स्लीपर क्लासचे तिकीट आरक्षण तिकीट खिडकीवर काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.

प्रशासनाने विशेष रेल्वे सोडल्या असल्या, तरी अनेक ट्रेन्सचे आरक्षण फुल्ल झाले आहे. तसेच जनरल डब्यांची संख्या कमी असल्याने त्यामध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील मार्गांवर विशेष गाड्या सोडाव्यात.
- नतीन वाघ, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Akola News : आरक्षण जाहीर! कुठे धक्का तर कुठे मिळाली संधी; जिल्ह्यातील पाच नगराध्यक्ष पदांवर महिलाराज

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

SCROLL FOR NEXT