पिंपरी, ता. ६ ः शहरातील किमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ लागली असून सोमवारी (ता. ६) कमाल तापमान ३० अंशांवर गेले. दुपारी उन्हाच्या झळा लागत असून घामाच्या धारा येऊ लागल्या आहेत. उन्हाचा चटका वाढल्यामुळे ‘ऑक्टोबर हीट’ जाणवत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे १०० टक्के भरली आहेत. मुळा, इंद्रायणी, पवना नदी दुथडी भरून वाहत आहेत. मात्र पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शहरात कमाल तापमानात वाढ होत असून मागील सात दिवसांत किमान तापमानात २ आणि कमाल तापमानात ५ अंशांनी वाढ झाली आहे. सोमवारी शहरात किमान २०.९ आणि कमाल ३०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
महिना - सरासरी - प्रत्यक्ष - टक्के (पावसाची आकडेवारी)
जून - १७५.५ - २३१.८ - १३२.१
जूलै - १९६ - १०१.७ - ५१.९
ऑगस्ट - १८४ - ११६.५ - ६३
सप्टेंबर - १५३.४ - २०४ - १३३
एकूण - ७०८.९ - ६५४ - ९२.३
हवामान बदलाचा परिणाम
शहरात गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला आहे. मात्र, कधी कडक ऊन, तर कधी ढगाळ वातावरण तयार होत आहे. हवामान बदलाचा परिणाम आरोग्यावर होत असून सर्दी, खोकला, ताप आदी आजारांनी डोके वर काढले आहे. खासगी आणि शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी पाहायला मिळते. हवामान बदलामुळे नागरिकांना विविध आरोग्यांच्या समस्या येत आहेत. नागरिकांनी योग्य आहार, चार ते पाच लिटर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
वार - किमान - कमाल तापमान
सोमवार - २१.३ - २६.६
मंगळवार - २०.८ - २८.४
बुधवार - २१.७ - २९.५
गुरुवार - २१.७ - २९.१
शुक्रवार - २२.५ - ३०.१
शनिवार - २२.१ - ३१.३
रविवार - २२ - २९.१
सोमवार - २०.९ - ३०.५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.