पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक
पिंपरी : विक्रीसाठी आणलेला गांजा बाळगल्याप्रकणी महिलेला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली. अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई पिंपरीतील भाटनगर येथे केली. महिलेकडून ४८ हजार २१० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. याबाबतची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. दरम्यान, आरोपी महिलेने जिच्याकडून गांजा आणला होता, तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरकोळ कारणावरून मारहाण, चौघांवर गुन्हा
पिंपरी : घरासमोर गोंधळ घालू नका म्हटल्याच्या रागातून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणर चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिंचवड येथे घडला. याप्रकरणी ऋषिकेश जगताप (रा. दगडोबा चौक, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओंकार कोळी, शाम कोळी, प्रशांत म्हेत्रे (सर्व रा. दगडोबा चौक, चिंचवड) व अन्य एकजण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र सौरभ कोळेकर हे कामावरून घरी आले असता आरोपी हे फिर्यादीच्या घरासमोर गोंधळ घालत होते. त्यामुळे फिर्यादीने त्यांना हटकले. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्याद आणि मित्र सौरभ यांना सिमेंट गट्टूने मारहाण केली.

साडेचार लाखांची ऑनलाइन फसवणूक

पिंपरी : ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंगच्या नावाखाली एका व्यक्तीची साडेचार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.
याप्रकरणी निगडी गावठाण येथील ४८ वर्षीय व्यक्तीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिता रिवेरा आणि जॉन जार्जे नावाच्या दोन आरोपींसह सहा वेगवेगळ्या बँक खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादीला फोनवरून ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले आणि त्याच्याकडून पैसे घेतले. मात्र, नंतर फिर्यादीला कोणताही परतावा किंवा मूळ रक्कम न देता त्यांची ४ लाख ४६ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

तडीपार गुंडाला अटक, पिस्तूल जप्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या एका गुंडाला चिखली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई चिखलीतील सेक्टर क्रमांक अठरा येथे करण्यात आली.
अनुराग कांबळे (१९, रा. गणेश कॉलनी, पाटीलनगर, चिखली) असे आरोपीचे नाव आहे. तडीपार असूनही तो स्पाइन रोड परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी सापळा रचून जॉग्रस पार्कजवळील सेवा रस्ता येथून त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Crime News: चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

SCROLL FOR NEXT