पिंपरी, ता. २८ : आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावर बेटिंगप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांवर कारवाई केली. यात पोलिसांनी २ लाख २५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी येथील रिव्हर रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली.
मयूर चंदर मेवानी (वय २५), धीरज चंदर मेवानी (वय २३) आणि आकाश हरेश आहुजा (वय २२, तिघे रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. एका बंद खोलीत हे तिघे राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकत्ता नाइट रायडर्स या संघांत सुरू असलेल्या सामन्यावर बेटिंग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई केली. यावेळी एका सोशल मीडिया ॲपव्दारे बेटिंग घेत होते. पोलिसांनी आरोपींकडून पाच मोबाइलसह २ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.