पिंपरी, ता. ३० ः आर्थिक वर्ष संपण्यास अवघा एक दिवस बाकी आहे. महापालिकेने मालमत्ताधारकांना तत्काळ कर भरण्याचे आवाहन केले आहे. थकबाकीदारांवर जप्तीबरोबरच नळजोड खंडित केले जात आहेत. आत्तापर्यंत एक हजार ६९ मालमत्ता जप्ती आणि एक हजार २० नळजोड खंडित केले आहेत. ४३४ मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी ३१ मार्चपूर्वीच थकबाकी भरणा करून कटू कारवाई टाळावी, असे आवाहन करसंकलन विभागाने केले आहे. शिवाय, नागरिकांच्या सोयीसाठी १८ विभागीय करसंकलन कार्यालये व कॅश काउंटर्स सोमवारी (ता. ३१) रात्री १२ वाजेपर्यंत खुली असतील, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.