सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३० : गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर पिंपरी-चिंचवडकरांनी यंदाही वाहन खरेदीला पसंती दिल्याचे दिसून आले. पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात सात दिवसांत नव्याने सहा हजार वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक दोन हजार ९७६ दुचाकींची संख्या आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा यंदा वाढल्याचे दिसून आले.
मुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी शोरूममध्ये रेलचेल असते. गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन, वस्तू खरेदी शुभ मानली जाते. पाडव्याच्या मुहुर्तावर वाहन घरी नेण्यासाठी नागरिक अगोदरच वाहनांचे बुकिंग करतात. यंदा २४ ते ३० मार्च या सात दिवसांत पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात ६ हजार ५० वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये २ हजार ९७६ दुचाकी, तर २ हजार २६८ चारचाकींची संख्या आहे. वाहन खरेदीसाठी आकर्षित करण्यासाठी यंदा विक्रेत्यांकडून सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. दुचाकीवर हेल्मेट, ॲक्सेसरिज मोफत देण्यात आल्या. गेल्यावर्षी गुढीपाडव्याला एक ते नऊ एप्रिल या काळात पाच हजार ५०० वाहनांची नोंद झाली होती.
-----
वाहनखरेदी आणि वर्ष
प्रकार - २०२५ - २,०२४
दुचाकी - २,९७६ - २,९६२
चारचाकी - २,२६८ - १,८५८
रिक्षा - १७४ - १४३
मालवाहू - ३२९ - २९३
इतर - ३०३ - २३९
-----
इलेक्ट्रिक वाहनखरेदी वाढली
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शहरात ५९० नव्या इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक दुचाकींचा समावेश आहे. गतवर्षी २२० वाहनांची नोंद झाली होती. शासनाने ई-वाहनांवरील अनुदान बंद केल्यामुळे या किमती वाढल्या आहेत. परंतु नागरिक पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन खरेदीला पसंती देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.