पिंपरी-चिंचवड

पिंपरीत सोने-चांदी खरेदीचा उत्साह

CD

पिंपरी, ता. ३० : पिंपरी चिंचवड शहरात गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत ग्राहकांनी रविवारी (ता. ३०) सोने-चांदी दागिन्यांची मनसोक्त खरेदी केली. गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवत नाणी आणि वेढणी खरेदीला प्राधान्य दिले, तर लग्नसराईनिमित्त अनेकांनी दागिने खरेदीला प्राधान्य दिले.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला सोने-चांदी, वाहन, घर, जमीन, नवीन वास्तूत प्रवेश शुभ मानले जाते. त्यामुळे सोने-चांदी खरेदीला प्राधान्य दिले जाते. दरम्यान, यंदा गुढीपाडव्याला सोने- १० ग्रॅम २४ कॅरेटचा भाव ८९ हजार ४०० रुपये (जीएसटीशिवाय), तर चांदीचा भाव प्रतिकिलो १,००,००० रुपये (जीएसटीशिवाय) होता. गुरुवारी (ता. २७) २४ कॅरेट सोन्याचा भाव ८८,८०० आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ८२,२०० रुपये (जीएसटीशिवाय) होता. सोने आणि चांदीच्या दरात दोनच दिवसात सहाशे रुपयांनी वाढ झाली. ही भाववाढ कायम होती, तरी रविवारी सराफा बाजार तेजीत होता.
दागिन्यांचे विविध प्रकार
शहरातील सराफी पेढ्यांमध्ये गळ्यातील दागिने, टेंपल ज्वेलरी, ॲन्टिक ज्वेलरी, इटालियन, रोज गोल्ड, पोलकी आणि जडाऊ अशा प्रकारचे दागिने उपलब्ध आहेत. तसेच नॅचरल डायमंड आणि ‘लॅबग्रोन’ डायमंडमध्ये विविध ज्वेलरी उपलब्ध आहेत.

सोने-चांदीच्या किंमती वाढल्या असल्या, तरी ग्राहक दागिने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. मात्र भाववाढीमुळे ग्राहकांची खरेदी क्षमता घटली आहे. दोन तोळ्याऐवजी एक तोळेच खरेदी करत आहेत. बरेच नागरिक आता डायमंड ज्वेलरी खरेदी करत आहेत.
- राहुल सोनिगरा, संचालक, एस.जे.पी.एल., चिंचवड स्टेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT