पिंपरी-चिंचवड

दिवाळीतील प्रदूषणावर पावसाचा शिडकावा

CD

पिंपरी, ता. ३० : शहरात दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनला शहरातील हवेचा दर्जा लक्षणीय खालावला होता. प्रामुख्याने फटाक्यांचा धूर, वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्रांमधील उत्सर्जनामुळे प्रदूषण वाढले. मात्र, यानंतर पडलेल्या पावसाने प्रदूषणाचा प्रभाव कमी झाला असून, हवेची गुणवत्ता ‘वाईट’ श्रेणीतून ‘मध्यम’ स्तरावर परत आल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

दिवाळीतील हवा प्रदूषण मोजण्यासाठी ‘एमपीसीबी’ उप प्रादेशिक कार्यालयाकडून भोसरी, पिंपळे निलख, जगताप डेअरी, डांगे चौक या भागात सर्वेक्षण करण्यात आले. ज्यामध्ये औद्योगिक क्षेत्र असलेल्या भोसरीत हवेची गुणवत्ता १९ व २१ ऑक्टोबरला १४१ नोंदविण्यात आली. जी ‘समाधानकारक’ श्रेणीत होती. तर, निवासी क्षेत्र असलेल्या जगताप डेअरी, पिंपळे निलख परिसरात २१ ऑक्टोबरला हवेची गुणवत्ता २६० च्या घरात म्हणजेच ‘खराब’ श्रेणीत पोचली होती. डांगे चौक या वाहतूक क्षेत्रात १९ ऑक्टोबरला ‘सर्वाधिक प्रदूषित’ २६१ होती.

‘पीएम १०’ व ‘पीएम २.५’ हे प्रदूषणाचे मुख्य कारण
दिवाळीच्या १७ ते २४ ऑक्टोबर या आठ दिवसांमध्ये निरीक्षण करण्यात आले. यापैकी १९ तारखेपासून प्रदूषणात वाढ दिसून आली. ज्यामध्ये हवेतील अतिसूक्ष्म कण अर्थात ‘पीएम२.५’ व ‘पीएम १०’चे प्रमाण लक्षणीय वाढल्यामुळे ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ अर्थात हवेची गुणवत्ता ढासळल्याचे आढळून आले आहे. ‘पीएम २.५’ हे श्वसन प्रणालीसाठी अत्यंत धोकादायक मानले जातात. कारण, त्यांचा आकार खूप लहान असल्याने ते थेट फुफ्फुसात प्रवेश करू शकतात. त्यामुळे या काळात सर्दी, खोकला व श्‍वसनाशी संबंधित आजारातही वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


दिवस भोसरी / जगताप डेअरी-पिंपळे निलख / डांगे चौक
१७ ऑक्टोबर ८७ / १२७ /९१
१८ ऑक्टोबर ११९ / १५५ /१६४
१९ ऑक्टोबर १४१ / २०८ / २६१
२० ऑक्टोबर ११७ /१४८ / १६२
२१ ऑक्टोबर १४१ / २६० / १७९
२२ ऑक्टोबर ६१ / ७६ / ११४
२३ ऑक्टोबर ७८ / ७६ /१०५
२४ ऑक्टोबर ५१ / ५३ /७१


हवा गुणवत्ता निर्देशांक
आकडेवारी : श्रेणी
०- ५० : उत्तम
५० ते १०० : समाधानकारक
१०१ ते २०० : मध्यम
२०१ ते ३०० : खराब
३०१ ते ४०० : अत्यंत खराब
४०१ ते ५०० : धोकादायक

हिवाळ्याच्या सुरुवातीला हवा कोरडी असल्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच हवेची गुणवत्ता ढासळते. दिवाळीत फटाक्यांच्या प्रदूषणामुळे ती आणखी ‘खराब’ श्रेणीत जाते. दिवाळीत ‘पीएम १०’ आणि ‘पीएम २.५’ हे दोन मुख्य प्रदूषक घटकांचे प्रमाण वाढलेले दिसते. ज्यामुळे श्‍वसनाचे गंभीर आजार होतात. या वर्षी आठवड्याच्या शेवटी पाऊस आल्याने हे प्रदूषण कमी झाल्याचे दिसून आले आहे.
- श्‍वेता वेर्णेकर, ‘परिसर’ संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India in WC Final: थँक्स टू Jesus! भारताला फायनलमध्ये पोहोचवल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज भानविक झाली; म्हणाली, शतकापेक्षा भारत जिंकणं महत्त्वाचं होतं...

IND beat AUS in Semi Final: विजयी धाव अन् जेमिमा रॉड्रिग्जसा अश्रू अनावर, हरमनप्रीत कौरही रडली; मुंबईच्या पोरीने मोडला गौतम गंभीरचा विक्रम Video Viral

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

SCROLL FOR NEXT