परिसर अस्वच्छ ; नागरिक त्रस्त
मागील काही दिवसांपासून अरुण वैद्य अग्निशामक दलाच्या इमारती शेजारी कचरा जमा झाला आहे. तसेच म्हाडाच्या इमारती क्रमांक ४१ ते ४९ मधील भाग अस्वच्छ आहे. परिसरातील गवत वाढले आहे आणि औषध फवारणी होत नसल्याने डास, बेडूक, उंदीर, घुशी तसेच सापांचा वावर वाढला आहे. डेंगी, चिकुणगुनिया यांसारखे साथीचे आजार देखील वाढत आहे. आरोग्य अधिकारी आणि प्रशासनाने लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.
-शशिदा इनामदार, संत तुकारामनगर
PNE25V63612
चेंबरची दुरुस्ती करावी
दापोडी येथील पवार वस्तीतील रहिवासी ललिता केंगार व प्राची जाधव यांच्या घरासमोरील चेंबरचे झाकण तुटले आहे. झाकण तुटल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची दखल घेऊन तत्काळ चेंबर दुरुस्त करावे.
-प्राची जाधव, दापोडी
PNE25V63617
निगडीत करऱ्याचा ढीग
निगडी प्राधिकरण येथील सेक्टर २७/अ अशोका बसस्थानका जवळ मागील अनेक दिवसापासून झाडांच्या फांद्या आणि राडारोडा पडून आहेत. त्यामुळे येथे डासांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या जागेची स्वच्छता करावी.
-सिराज शेख, निगडी
PNE25V63616
पदपथावर अनधिकृत वस्ती
काळेवाडी फाटा येथील कस्पटे वस्ती परिसरात पदपथावर अनेक दिवसांपासून काही लोकांनी संसार मांडला आहे. चौक, बस स्थानक आणि इतर ठिकाणी वापरलेल्या वस्तू, खरकटे टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यांच्या कुटुंबातील लहान मुले रस्त्यावर भीक मागतात, तिथेच शौच करतात. त्यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. कृपया प्रशासनाने याची दखल घ्यावी.
डॉ. आदिती घोडके, काळेवाडी फाटा
PNE25V63615
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.