पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

ट्रक पार्किंगमुळे पदपथ अडला
पिंपळे गुरव येथील जगताप पेट्रोल पंपाच्या अलीकडे हार्डवेअर आणि सिमेंट विक्री करणारा दुकानदार त्याच्याकडील मालवाहतूक ट्रक दररोज पदपथावरच उभा करतो. त्यामुळे पादचाऱ्यांना अडचण होत आहे. या रस्त्यावरून अनेकवेळा राजकीय, सामाजिक कार्यकर्ते ये जा करीत असतात, ते कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास वाहतूक पोलिस विभागाला कळवित नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. तसेच या ट्रक मालकावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
-एक वाचक, नवी सांगवी
PNE25V65919


पाण्याचा तलाव की पालिकेचा रस्ता?
महापालिकेने स्मार्ट सिटीतील विविध ठिकाणचे रस्ते, पदपथ स्मार्ट बनविलेले आहेत. परंतु या रस्त्यांच्या सम पातळीचा, उंच सखल भागांचा अभ्यास न करता बनविल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पाणी साठत आहे. पावसाचे पाणी निचरा होत नाही. त्यामुळे वाहुतक थांबली जाते. तसेच जे वाहनचालक पाण्यातुन मार्ग काढतात त्यांचा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊ शकतो, पाण्यामुळे वाहने बंद पडून वाहनांचे नुकसान होई शकतो. असे हे ठिकाण म्हणजे स्पाईन रस्त्यावरील शरदनगर ते घरकुल चौक. पावसाचे पाणी साठणार नाही यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
-बी. एस. पाटील, संभाजीनगर
PNE25V65918

वल्लभनगरमध्ये बीआरटी काम सुरू पण सुरक्षा नाही
मागील काही महिन्यांपासून वल्लभनगर येथे सुकवानी कॅम्पस समोर ‘बीआरटी’चे काम सुरू आहे. परंतु हे काम अतिशय बेजबाबदारपणे चालू आहे. कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही, परिणामी रात्रीच्या वेळी अंधारात अपघाताचे धोके वाढले आहेत. यामुळे मागील दोन दिवसात दोन वाहने खड्ड्यात पडली आहेत. अनेक वेळा नागरिकांनी जनसंवाद सभांमध्ये हा मुद्दा मांडला आहे, तरीही प्रशासन मूकदर्शक भूमिकेतच आहे. अशा बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे.
-एक नागरिक, वल्लभनगर
PNE25V65920

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

Pune News : जेवणात झुरळ, पिन! COEP च्या मुलींच्या वसतिगृहात मनविसेचे तीव्र आंदोलन; विद्यापीठाला ७२ तासांचे अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: जिल्हा परिषद निवडणुकांची लवकरच घोषणा!

Railway Ticket Booking : रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये केला मोठा बदल!

SCROLL FOR NEXT