पिंपरी, ता.७ : चिऊ-काऊच्या गोष्टी ऐकण्याच्या वयात पक्षी निरीक्षणाचा छंद बाळगणारा अर्पित चौधरी हा सध्या कौतुकाचा विषय ठरला आहे. अवघे सात वर्षे वय असलेला अर्पित देश-विदेशांतील सुमारे ७०० पेक्षा अधिक पक्षी ओळखतो. ३२५ पक्ष्यांच्या प्रजातींच्या प्रत्यक्ष नोंदी त्याने केल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या ‘पक्षी सप्ताह’निमित्त अर्पितचा छंद अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरक ठरत आहे.
अर्पित निगडीच्या ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयात इयत्ता दुसरीत शिकतो. वडील डॉ. अक्षय यांच्यासह त्याने साप आणि पक्ष्यांवर आधारित पुस्तके पाहण्यास, वाचण्यास सुरुवात केली. त्यातून त्याला निसर्गाची आवड निर्माण झाली. आई-वडिलांनीदेखील अर्पितला प्रत्यक्ष जंगलात नेऊन प्राणी-पक्षी दाखवण्यास सुरुवात केली. आता अर्पित ‘ई-बर्ड’ किंवा ‘मर्लिन’ यांसारखे पक्षी निरीक्षणासाठीचे ॲपही सहजरित्या हाताळतो. यामध्ये त्याने हळदीकुंकू बदक, तरंग बदक, तलवार बदक अशा काही प्रजातीबरोबरच छोटा-कंठेरी चिखल्या, उघड्या चोचीचा करकोचा, रंगीत करकोचा, नदी सुरय अशा काही पक्ष्यांच्या नोंदीदेखील केल्या आहेत. पानपक्ष्यांची गणना उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, साहाय्यक वनसंरक्षक दत्तात्रेय मिसाळ यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत वन परिक्षेत्र अधिकारी (खर्डी) एकनाथ रोंगटे, तानसाचे रमेश रसाळ आणि वैतरणाचे प्रकाश चौधरी यांच्या सहकार्याने ‘आऊल कॉन्झर्वेशन फाउंडेशन’चे पक्षी अभ्यासक रोहिदास डगळे यांनी केली.
अर्पितकडे पक्षी, निसर्ग व इतर विषयांवरील १०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह असल्याची माहिती डॉ. अक्षय चौधरी यांनी दिली.
‘उदयोन्मुख पक्षीमित्र’ पुरस्कार
अर्पितच्या उल्लेखनीय कामाची दखल महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाने घेतली. अमरावती येथे नुकत्याच झालेल्या तिसऱ्या अखिल भारतीय व ३८व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात अर्पितला ‘उदयोन्मुख पक्षीमित्र पुरस्कार’ आणि रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारा अर्पित सर्वांत लहान पुरस्कारार्थी ठरला. अर्पितने संमेलनात केलेल्या सादरीकरणाबद्दल उपस्थितांनी कौतुकही केले. संमेलनानंतर त्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन अतिदुर्लभ रानपिंगळा (फॉरेस्ट आउलेट) या पक्ष्याची यशस्वी नोंदही केली.
अर्पित चौधरीची ठळक कामगिरी
- वाइल्डलाइफ रिसर्च ॲंड कंझर्व्हेशन सोसायटी आणि सोलापूर वनविभागातर्फे आयोजित, उजणी धरण पक्षी गणनेमध्ये पाचवेळा सहभाग
- तानसा अभयारण्यात पानपक्षी गणनेत सहभाग
- राज्यातील सहा जिल्हे, तसेच देशातील ५ राज्यांमध्ये पक्षीनिरीक्षण
- कोटीगाव, गोवा येथे झालेल्या बर्ड कॅम्पमध्ये सहभाग
- अलाइव्ह चॅरिटेबल ट्रस्ततर्फे आयोजित ‘चला चिऊ वाचवू’ अभियानात सादरीकरण व सहभाग
- ई-बर्ड ॲपवर ३२५ पेक्षा जास्त, तसेच आय-नॅट ॲपवर ५०० हून जास्त नोंदी
PNE25V65835
PNE25V65943, PNE25V65941, PNE25V65940, PNE25V65944
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.