पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड करंडक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

CD

पिंपरी, ता. ११ ः पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने हिंजवडी येथे आयोजित आंतर क्लब पिंपरी चिंचवड करंडक खुल्या टी-ट्‍वेंटी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एसजेएसएफ येलो संघाने विजयी सलामी दिली.
या स्पर्धेचे उद्‍घाटन प्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष वसंत कोकणे, सचिव राजू कोतवाल, खजिनदार संजय शिंदे, मुकेश गुजराती, विकास डांगे, धनराज मगनानी आदी उपस्थित होते. विजयी संघाच्या रोमित जोशीने शानदार फलंदाजी केली. सामन्याचा मानकरी म्हणून त्याला गौरविण्यात आले. ही स्पर्धा बाद पद्धतीने खेळविली जाणार असून विजेत्या संघाला २५ हजार रुपये रोख, करंडक प्रदान केला जाणार आहे. उपविजेत्या संघाला १५ हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला ५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. याखेरीज, अन्य वैयक्तिक बक्षिसेही दिली जाणार आहेत.

संक्षिप्त धावफलक ः
एसजेएसएफ (येलो) ः २० षटकांत ५ बाद २२८ - रोमित जोशी ७१, केतन गायकवाड ७२, रुद्र पटेल २७,
गणेश अंकुशे २२ (राहुल चावरिया ३-२६) वि.वि. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ः १९ षटकांत सर्व बाद ५४ - सचिन लोणे १८ (कुलदीप नायडू ४-८, ललित सोनवणे २-८).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT