पिंपरी-चिंचवड

ड्रेनेजची झाकणे खचल्याने अपघाताचा धोका

CD

पिंपरी, ता. १८ ः निगडी-तळवडे या मार्गावर अनेक ठिकाणी ड्रेनेजची झाकणे (ड्रेन कव्हर) खचली आहेत. गणेशनगर जवळ रस्त्याच्या मधोमध असलेले ड्रेनेजचे झाकण तुटले आहे. त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
निगडी-तळवडे हा मार्ग देहूगाव, चाकण आणि उपनगरांना शहराशी जोडतो. तसेच चाकण-भोसरी या दोन्ही एमआयडीसीला जोडणार महत्त्वाचा मार्ग आहे. देहू, तळवडे या परिसरांतून दररोज हजारो कामगार शहरात येतात. तसेच चाकण-भोसरी या दोन्ही एमआयडीसींना जोडणारा मार्ग असल्यामुळे येथून अवजड वाहने जातात. तसेच शहरात येण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे वर्दळ असते. मात्र, या मार्गावर रस्त्याच्या मधोमध आणि बाजूला अनेक ठिकाणी ड्रेनेजची झाकणे खचली आहेत. वाहतूक संथ होऊन कोंडीचा सामना करावा लागतो. ही झाकणे रात्री दिसत नाहीत. त्यामुळे विशेषत: दुचाकींचे अपघात होत आहेत. महापालिका प्रशासनाने या मार्गावरील सर्वच ड्रेनेजची झाकणे रस्त्याच्या समांतर करावीत, तसेच तुटलेली झाकणे बदलावीत, अशी मागणी केली जात आहे.

-----
फोटो - 90969

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT