पिंपरी-चिंचवड

आधी प्रेमाच्या आणाभाका, नंतर प्रसंग बाका प्रेमभंगाचा परिणाम ः एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय बेततोय जिवावर

CD

पिंपरी, ता. १८ : एकमेकांवर प्रेम जडल्यानंतर कायम सोबत राहण्याचा शब्द दिला जातो. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. वेगवेगळी स्वप्नं रंगवली जातात. दोघेही एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतात. मात्र, काही कारणांवरून तिने दूर जाण्याचा निर्णय घेतल्यास प्रियकराकडून प्रेयसीला शारीरिक, मानसिक त्रास दिला जातो. या त्रासातून प्रेयसी जीवन संपविण्याचा निर्णय घेते. असाच प्रकार दहा दिवसांपूर्वी वाकड येथे घडला. यावरून सुरवातीचे प्रेम नंतर तरुणींच्या जिवावर बेतत असल्याचे समोर येते.
आपले प्रेम दुसऱ्यावर जबरदस्तीने मान्य करायला लावणे योग्य नाही. प्रेमात व्यक्तीच्या मनात आपल्या आवडीच्या व्यक्तीचे विचार, आठवण येत असते. त्यावर आपण नियंत्रण करू शकतो. परंतु, दुसऱ्या व्यक्तीनेही माझ्यासाठी तिचे विचार बदलले पाहिजेत, ही अपेक्षा आपण कशी काय करू शकतो. प्रत्येकवेळी दिलेला नकार, तोच तोच विचार मनात आणणे आपण सोडून दिले पाहिजे. एकच गोष्ट कवटाळून धरून किती दिवस राहणार? एकतर्फी प्रेमात स्वतःला त्रास करून घेतला जातो आणि कुटुंबीयांनाही. त्यामुळे पुढे होणाऱ्या विपरीत घटनांना सामोरे जावे लागते. याचे भान ठेवणे गरजेचे आहे.

----------------------------------

‘‘कोणाच्या तन, मन यावर जबरदस्तीने ताबा मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जाणे. स्वतःचे कुटुंब, समाज यासाठी घातक ठरू शकते. नकार पचवता येत नाही, राग अनावर होत असतो. अशावेळी व्यक्तीने संयम बाळगणे आवश्यक आहे. जी व्यक्ती आपली होणार नाही, अशा व्यक्तीपासून दूर राहा. जर तुमच्यात धैर्य असेल आणि सर्व बाजूच्या परिस्थितीचा, स्वतःच्या स्वभावाचा विचार करून, एकमेकांना मान्य असेल, स्वतःवर विश्वास असेल, तर त्या व्यक्तीला मित्र बनवू शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारे जबरदस्ती नाही ना, हे पडताळून पहा.
- वंदना मांढरे, समुपदेशिका.
---------------------------------

* उपाय
- नवीन लोकांशी भेटा, संवाद साधा.
- नवीन मित्र बनवायला वेळ लागत नाही .
- आवडीचे छंद जोपासा.
- कोणतीही सवय लागायला व मोडायला एकवीस दिवस लागतात. प्रयत्न करून पहा..
- जग सुंदर आहे. बस तुम्हाला जगता यायला हवे.
- एकतर्फी प्रेमाचा त्रास नकळत सर्वांनाच भोगावा लागतो. त्यामुळे योग्य निर्णय घ्या.
- ----------------------------

* घटना घडण्यामागची कारणे
-⁠ नकार पचवण्याची तयारी नसणे
- एकटेपणा
⁠- चिंता
- नात्यात तुटकता
---------------------------

उपाय
१.स्वतःबद्दल व परिस्थितीबद्दल चिंतन करणे
२. स्वतःच्या नात्याबद्दल सीमा निश्चित करणे
३. ⁠छंद जोपासणे
४. भवितव्याचा नव्याने , आत्मविश्वासाने विचार करणे
५. ⁠अवास्तव अपेक्षा पासून स्वतःला वाचवणे
६. ⁠निरोगी नातेसंबंध जोपासणे

-------

घटना
१५ जानेवारी २०२५
- ताथवडे येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिस तपासात प्रियकराकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने जीवन संपविल्याचे समोर आले.

- १० ऑक्टोबर २०२४

प्रेयसीवर चाकूने वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रियकराने स्वत: फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पिंपरीतील एका लॉजच्या रूममध्ये घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT