पिंपरी, ता. १९ : वाढदिवसाचे अनधिकृत फलक उभारल्याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार निगडी प्राधिकरणातील भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक रस्ता दरम्यान घडला. ऋषीकेश माणगावकर व रोहित चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाचे परवाना निरीक्षक राजेंद्र चौधरी यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे सहकारी लिपिक धनंजय पाटील यांनी परिसरात पाहणी केली असता, भक्ती -शक्ती चौक ते मुकाई चौक रस्ता तसेच किवळेला जोडणारा रेल्वे पुलावरील महापालिकेच्या दिशादर्शक कमानीवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा अनधिकृत फलक लावल्याचे निदर्शनास आले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.