पिंपरी, ता. १९ ः राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची परीक्षा उद्यापासून (ता. २१) सुरू होणार आहे. परीक्षेसाठी महापालिकेचा माध्यमिक विभाग सज्ज झाला असून आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील २८ हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यावर भर असल्याचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध माध्यमांतील एकूण २८ हजार विद्यार्थी यंदा दहावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षार्थींमध्ये विद्यार्थिनींपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. शहरात ४८ परीक्षा केंद्रे असून त्यातील आकुर्डी आणि काळभोरनगर येथील प्रत्येकी एकेक परीक्षा केंद्र संवेदनशील आहेत. दरवर्षी परीक्षेत कॉपी केसेस, बोगस विद्यार्थी सापडणे, समूह कॉपी, पेपर व्हायरल होणे असे प्रकार घडताना दिसतात. यंदा मात्र गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कडक उपाय योजना करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाची तयारी...
- कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त
- सर्व विद्यार्थ्यांची कसून तपासणी करण्यात येणार
- प्रत्येक केंद्रात व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार
- परीक्षा केंद्रावर देखरेख ठेवण्यासाठी चार भरारी पथकांची नेमणूक
- विद्यार्थी - पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती
- विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दहा मिनिटे अतिरिक्त दिली जाणार
तासभर लवकर या...
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. ते टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दडपण न घेता पेपर सोडवा !
प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी दहावीची परीक्षा हा एक महत्वाचा टप्पा असतो. आपल्या शालेय जीवनात विद्यार्थी पहिल्यांदाच अशा मोठ्या परीक्षेला सामोरे जात असतात. अशा वेळेस कुटुंबाकडून आजूबाजूच्या समाजाकडून विद्यार्थ्यांवर दडपण येत असते. परंतु अशा वेळेस घाबरून न जाता किंवा कोणताही ताण न घेता विद्यार्थ्यांनी पेपर सोडवावेत, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.
एकूण विद्यार्थी - २८,०००
महापालिका शाळेतील विद्यार्थी - २,८००
खासगी शाळेतील विद्यार्थी - २५,२००
एकूण परीक्षा केंद्र - ४८
महापालिका शाळेतील परीक्षा केंद्र - १०
खासगी शाळेतील परीक्षा केंद्र - ३८
भरारी पथके - ४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.